४५०० वरच स्थिरावला कापसाचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:46 AM2017-11-10T00:46:25+5:302017-11-10T00:46:56+5:30

यंदा विविध कारणांनी खरीपात शेतकºयांना कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे.

The price of cotton stays up to 4500 | ४५०० वरच स्थिरावला कापसाचा भाव

४५०० वरच स्थिरावला कापसाचा भाव

Next
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : ६ हजार दराची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा विविध कारणांनी खरीपात शेतकºयांना कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे. अशा स्थितीत कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकºयाला केवळ ४४०० ते ४५०० रुपये क्विंटल भाव खासगी व्यापारी देत आहे. यामुळे शासनाकडून कापूस उत्पादक शेतकºयांची मोठी कुचंबना करण्यात येत आहे.
विदर्भात वर्धा जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतीचा कापूस पिकतो. यामुळे कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियासह राज्य व देशातील अनेक व्यापारी कापूस खरेदीसाठी वर्धा जिल्ह्यात येतात. यंदाही सरकारची खरेदी सुरू होण्यापूर्वी व्यापाºयांची कापूस खरेदी सुरू झाली आहे; पण व्यापाºयांकडून शेतकºयांना केवळ ४४०० ते ४५०० रुपये भाव दिला जात आहे. दररोज हा भाव बदलत असून कोणत्या दिवशी कोणता भाव राहिल, याची शाश्वती राहिलेली नाही. शासनाने केवळ नावापूरते कापूस खरेदी केंद्र सुरू केले. त्याकडे कुणीही शेतकरी येऊ नये, अशी व्यवस्थाच केली असल्याचे चित्र आहे. यावर्षी कापसावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला तसेच किटकनाशकाचा खर्चही वाढला. अत्यल्प पावसामुळे कापसाचे उत्पादन कमी येण्याची शक्यता असताना कापसाचा भाव मात्र स्थीरावलेला आहे. कापूस वेचणीचा खर्च दरवर्षीपेक्षा यंदा वाढल्याचे दिसून येत आहे. किमान एका महिला मजुरावर ७० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत केवळ ४४०० रुपये भावावर शेतकºयाला कापूस पीक परवडणारे नाही, हे वास्तव आहे.

इतर देशांत यावर्षी कापसाचे पाहिजे तेवढे उत्पादन झाले नाही. यामुळे भारतातील कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; पण भाव ४५०० वर स्थिरावले आहे. यामुळे शेतकºयांचा हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा कापसाला प्रती क्विंटल ६००० रुपये भाव मिळायला हवा; पण सरकारकडून याबाबत काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे खासगी व्यापारी ४४०० रुपये दराने कापूस खरेदी करीत आहे. शासनाने क्विंटलमागे २५०० रुपये बोनस सरसकट कापूस उत्पादक शेतकºयांना द्यावा. पणन महासंघ, सीसीआय व खासगी व्यापारी यांना कापूस विकणाºया सर्व शेतकºयांचा या बोनसमध्ये समावेश करावा.
- सुधाकर देवराव माहुरे, शेतकरी, मौजा जखाळा, घोराड.

Web Title: The price of cotton stays up to 4500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.