रुग्णांची वेदना आनंदात परावर्तीत व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:02 AM2018-04-14T00:02:51+5:302018-04-14T00:02:51+5:30

पूर्वी विदर्भातील जनता उपचारांसाठी पुणे, मुंबई या शहराकडे धाव घेत होती. आता पुणे, मुंबई आणि अन्य महानरातील रुग्ण सावंगी येथील रुग्णालयाबद्दल विचारतात तेव्हा आनंद होतो. ही मोठी मिळकत इथल्या अत्याधुनिक रुग्णसेवेने प्राप्त केली आहे.

Patients pain should be reflected in happiness | रुग्णांची वेदना आनंदात परावर्तीत व्हावी

रुग्णांची वेदना आनंदात परावर्तीत व्हावी

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सी.टी. स्कॅन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पूर्वी विदर्भातील जनता उपचारांसाठी पुणे, मुंबई या शहराकडे धाव घेत होती. आता पुणे, मुंबई आणि अन्य महानरातील रुग्ण सावंगी येथील रुग्णालयाबद्दल विचारतात तेव्हा आनंद होतो. ही मोठी मिळकत इथल्या अत्याधुनिक रुग्णसेवेने प्राप्त केली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची वेदना आनंदात परावर्तीत व्हावी, अशी भावना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे गामीण रुग्णालयात आयोजित लोकर्पण समारोहात ते बोलत होते. ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते सावंगी रुग्णालयातील नव्या अत्याधुनिक सी.टी. स्कॅन यंत्राचे व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. रुग्णालयाच्या हिप्पोक्रेटस् सभागृहात आयोजित या समारोहाच्या अध्यक्षस्थानी आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे होते. कार्यक्रमाला आ. डॉ. पंकज भोयर, माजी आमदार सागर मेघे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दत्ता मेघे यांनी रुग्णालयाद्वारे सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाºया आरोग्यसेवेचा आवर्जून उल्लेख केला. अनेक संकटे येत राहतात, पण कोणतेही गैरकृत्य होणार नाही, याची दक्षता आम्ही सातत्याने घेत राहतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या निधीतून सावंगी रुग्णालयाला अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर, रुग्णालयात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या सी.टी. स्कॅन यंत्राद्वारे संपूर्ण शरीराचे स्कॅन करण्यासोबतच सी.टी. एंजिओग्राफी व थ्रीडी रिकन्स्ट्रक्शनही केले जाते. बाल हृदयरुग्णांची नॉन इन्व्हेसिव्ह कार्डिअ‍ॅक सुविधाही यात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या लोकार्पण समारोहाचे प्रास्ताविक डॉ. महाकाळकर यांनी केले तर आभार सी.ए. गणेश खारोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला रुग्णालय परिवारातील सदस्यांसोबतच नागरिकांचीही उपस्थिती होती.

Web Title: Patients pain should be reflected in happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.