शिक्षण सभापतीच्या कार्याच्या अहवालाचे शिक्षणमंत्र्यांकडून अवलोकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:40 AM2017-10-23T00:40:33+5:302017-10-23T00:40:47+5:30

नगर पालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आल्यानंतर शिक्षण सभापती श्रेया देशमुख यांनी केलेल्या विविध विकासात्मक तसेच शिक्षण सभापती म्हणून केलेल्या विविध शैक्षणिक धोरणांची माहिती .....

Overview of Education Chairman's Report on Education | शिक्षण सभापतीच्या कार्याच्या अहवालाचे शिक्षणमंत्र्यांकडून अवलोकन

शिक्षण सभापतीच्या कार्याच्या अहवालाचे शिक्षणमंत्र्यांकडून अवलोकन

Next
ठळक मुद्देछोटेखानी कार्यक्रमाला खासदारांसह आमदारांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगर पालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आल्यानंतर शिक्षण सभापती श्रेया देशमुख यांनी केलेल्या विविध विकासात्मक तसेच शिक्षण सभापती म्हणून केलेल्या विविध शैक्षणिक धोरणांची माहिती असलेल्या अहवालाचे शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी अवलोकन केले.
शालेय क्रीडा व शिक्षणमंत्री वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर आले असता आ. डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात सदर अहवाल पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. अनिल सोले, माजी खासदार सुरेश वाघमारे, भुपेंद्र शहाणे, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकुर, शिक्षण सभापती श्रेया देशमुख, बांधकाम सभापती निलेश किटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ना. तावडे यांनी शिक्षण विभागाचे प्रतिनिधीत्त्व करायला मिळणे ही महत्त्वाची बाब असते. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रासोबत आपण जुळून राहत असल्याने शिक्षण व विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात येतात. ज्या अडचणी आपल्या लक्षात येतात त्या सोडविण्यासाठी नपच्या शिक्षण सभापती श्रेया देशमुख यांनी पुढाकार घेतला असल्याचे या अहवाल पुस्तिकेतुन लक्षात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला प्रदीप ठाकरे, अभय नगरे, मंगेश मांगलेकर, शिवा माळोदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Overview of Education Chairman's Report on Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.