अवघ्या काही तासात चोरट्यास केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:08 AM2019-01-30T00:08:30+5:302019-01-30T00:09:01+5:30

लग्न समारंभात आलेल्यांचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार खरांगणा पोलिसात दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेत अवघ्या काही तासातच खरांगणा पोलिसांनी चोरट्याला हुडकून त्याला जेरबंद केले.

Just in a few hours the thieves have been robbed | अवघ्या काही तासात चोरट्यास केले जेरबंद

अवघ्या काही तासात चोरट्यास केले जेरबंद

Next
ठळक मुद्देदागिने जप्त : खरांगणा पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लग्न समारंभात आलेल्यांचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्यानेचोरून नेल्याची तक्रार खरांगणा पोलिसात दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेत अवघ्या काही तासातच खरांगणा पोलिसांनी चोरट्याला हुडकून त्याला जेरबंद केले. शिवाय चोरट्याकडून चोरीचे सुमारे २ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे पोलिसांनी जप्त केले आहे. शुभम खुणे रा. रामनगर वर्धा, असे आरोपीचे नाव आहे.
नागपूर येथील रहिवासी असलेले प्रणव वसंत शिंदे हे परिवारासह आर्वी मार्गावरील आदित्य पॅलेस येथे लग्न समारंभात उपस्थिती दर्शविण्यासाठी आले होते. लग्न समारंभ आटोपून ते आजी (मो.) मार्गे परतीचा प्रवास करीत असताना त्यांच्या जवळील ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत खरांगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आपल्या तपास सुरू केला. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे शुभम याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहे. त्याला न्यायालयात हजर करून त्याची चार दिवसीय पोलीस कोठडी पोलिसांनी मिळविली. या चोरट्याकडून अधिक काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून ही ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर व त्यांंच्या सहकार्यांनी केली.
 

Web Title: Just in a few hours the thieves have been robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.