शुक्रवार ठरला मोर्चांचा वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:38 PM2017-10-06T23:38:05+5:302017-10-06T23:38:16+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय, बीएसपी विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात ....

Franc | शुक्रवार ठरला मोर्चांचा वार

शुक्रवार ठरला मोर्चांचा वार

Next
ठळक मुद्देवर्धेत अंगणवाडी कर्मचारी व निमाचा तर हिंगणघाटात शेतकºयांच्या मागण्यांकरिता सर्वपक्षीय मोर्चा

हिंगणघाटात निघाला सरकार विरोधात सर्वपक्षीय मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय, बीएसपी विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात शुक्रवारी हिंगणघाट शहरात मोर्चा काढण्यात आला.
भाजप सरकारच्या काळात राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गत तीन वर्षांच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आरोप या सर्व राजकीय पक्षांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती घसरलेल्या असताना राज्य व केंद्र सरकार विविध कर लावून जनतेला लुटत आहे, असा आरोप करण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हरिष वडतकर, भाराकाँचे सरचिटणीस शालिकराम डेहणे, आफताब खान, संजय तपासे, राजकुमार मेश्राम, अनिल मून, विलास टेंंभरे, लता घवघवे, नगरसेविका सीमा मेश्राम यांच्यासह इतरांनी केले. त्यानंतर मोर्चेकºयांच्या वतीने तहसीलदारामार्फत राज्य सरकारला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात सरकारने सरसकट १०० टक्के कर्ज माफी द्यावी, शेतकºयांना उत्पादन खर्च व ५० टक्के नफा या तत्वावर हमी भाव द्यावा, कपाशीवर आलेल्या रोगाचे सर्वेक्षण करून एकरी २५००० रुपये मदत द्यावी, झोडपटीचे तत्काळ पुनर्वसन करून पट्टे वाटप करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Franc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.