पावसाचे पाणी वाहते करा, किटकजन्य आजार टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:54 PM2017-10-09T23:54:31+5:302017-10-09T23:54:42+5:30

सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. घरातील रिकामी भांडी, टायर यात पावसाचे पाणी साचत असून याच पाण्यात डासांची उत्पत्ती होते.

Due to rain water, avoid pesticides | पावसाचे पाणी वाहते करा, किटकजन्य आजार टाळा

पावसाचे पाणी वाहते करा, किटकजन्य आजार टाळा

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाचे आवाहन : सावधान; दक्ष न राहिल्यास जडतील डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर, चंडीपूरा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. घरातील रिकामी भांडी, टायर यात पावसाचे पाणी साचत असून याच पाण्यात डासांची उत्पत्ती होते. हे डास हिवताप, डेग्यू, मेंदुज्वर, चंडीपूरा आदी विविध आजारांचे मुळ असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या परिसरातील नाल्या वाहत्या करणे व ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचू न देण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
घराच्या छतावरील रिकाम्या भांड्यात तसेच घराच्या आवारात कुठेही पावसाचे पाणी साचल्यास त्या पाण्यात डास अळी मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. त्यामुळे डासाची घनताही वाढते. डासांच्या वाढलेल्या घनतेमुळे किटकजन्य आजार जसे हिवताप डेंग्यू, चिकुणगुणीया, मेंदुज्वर, चंडीपूरा आजाराचा प्रादूर्भाव वाढू शकतो. यामुळे मनुष्यावर प्रमाणात विपरीत प्रभाव होऊ शकतो. किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्यासह आरोग्य विभागाने केले.

दक्षता घेण्याकरिता सांगण्यात आलेले उपाय
सर्व गावामध्ये नाल्याचे पाणी वाहते राहील अशापद्धतीने बांधणी करणे.
नाल्या नेहमी वाहत्या करणे व लघुयांत्रिकी पद्धत राबविणे.
शाळेभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे.
बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात रॉकेल व आॅईल टाकावे.
बांधकामावरील मजूराला ताप आल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात नेऊन रक्त नमूणे तपासणी करणे.
दूषित रूग्णाला समूळ उपचार देणे. तसेच सर्व स्थलांतरीत मजूरांची भ्रमणध्वनी क्रमांक सह नोंद ठेवणे.
फुटलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती करणे.
तलाव जलशिवारात इतर वनस्पती वाढू न देणे तसेच त्यात डास अळी भक्षक गप्पीमासे सोडणे.
परिसरात जमा असलेले इलेट्रॉनिक्स कचºयाचे ढिगारे रचलेले टायर्स यावर पावसाळ्याच्या दिवसात प्लास्टिक झाकणे आवर्जुन लावणे.
शेणाचे ढिगारे गावाच्या बाहेर ठेवावे तसेच लहान मुलांना जमिनीवर व भिंतीशी झोपवू नये.

Web Title: Due to rain water, avoid pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.