इंजिनद्वारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणऱ्यां

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 08:48 PM2018-11-10T20:48:36+5:302018-11-10T20:49:30+5:30

बोर जलाशयातील पाणी ओलितासाठी सोडण्यात आले एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र कमी पाण्यात ओलितासाठी शेतकऱ्यांनी इंजिनचा वापर करण्याचा प्रयत्न करताच त्या शेतकऱ्यांना इंजिन जप्तीचा धाक दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

Difficulty with the farmers taking water through the engine | इंजिनद्वारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणऱ्यां

इंजिनद्वारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणऱ्यां

Next
ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : धरणातून सोडलेले पाणी पंपाने उचलण्याची परवानगी द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : बोर जलाशयातील पाणी ओलितासाठी सोडण्यात आले एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र कमी पाण्यात ओलितासाठी शेतकऱ्यांनी इंजिनचा वापर करण्याचा प्रयत्न करताच त्या शेतकऱ्यांना इंजिन जप्तीचा धाक दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.
पाटचऱ्या व वितरिकांची नावा पुरुती साफसफाई करून गत १० दिवसाअगोदर बोर वितरिकेला बोर जलायशातून पाणी सोडण्यात आले. मोई गावानजीक असलेल्या बीबीच्या टेकडीजवळ मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. हळूहळू पाणी पुढे सरकू लागले. आधीच शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीत चणा पेरणीला प्राधान्य दिले. यास पिकाला तुषार सिंचनाने पाणी देण्याची आवश्यकता असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कॅनलवर डिझेल इंजिन लावून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाण्याचा कमी प्रमाणात वापर होईल. लवकर ओलित करता येईल व पाण्याचा अपव्ययही होणार नाही, अशी मानसिकता यामागे शेतकऱ्यांची होती. पण याच शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व कंत्राटी मजुराकडून इंजिनद्वारे पाणी ओलण्यास मनाई करून इंजिन जप्तीची व पोलिसांचा धाक दाखवून इंजिन काढण्यास बाध्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना गळ घातली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र ओलितासाठी रात्रीचा दिवस शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाविरोधात रोष वाढला आहे.
इंजिन लावण्यास मनाई केली नसल्याचा दावा
सेलू उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता असे काहीही नाही, तशी इंजिनाद्वारे पाणी ओलण्यास मनाई केली नाही, असे सांगितले तर शाखा अभियंता राऊत यांनी पाणी कमी आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचणे हा उद्देश आहे. एक दोन दिवसानंतर इंजिनद्वारे पाणी ओलणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेणार असल्याचे सांगितलेयावरुन आगामी पाणी टंचाईचे संकेत मिळत असल्याने लवकरात लवकर यावर प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. या सर्व कार्यप्रणालीमुळे रोष वाढत चालला आहे.
नादुरूस्त पाटचऱ्यां
बोर वितरिका, पाटचऱ्याची दुरावस्था पाहता शेताच्या बांधापर्यंत पाणी नेताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय उघड्या डोळ्यांनी पाहावा लागत आहे हे विशेष.
रोजंदारी कर्मचाऱ्यांची दादागिरी
अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने काही रोजंदारी कर्मचारी कामावर घेतले आहे. या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न होत आहे तर नव्याने निवडण्यात आलेल्या पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नाममात्र ठेवण्यात आले आहे.

वितरीकांची साफसफाई रखडली
बोर जलाशयात पाणीसाठा कमी असला तरी बोरधरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यात येत आहे. वितरिकांची साफसफाई करण्यात येत असली तरी ती नावालाच असल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. मागील ५० वर्षांपासून याच वितरिकेद्वारे धरणाचे पाणी सोडण्यात येते. त्या वितरीका दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असताना रबी हंगामाच्या वेळी जेसीबी लावून काही ठिकाणी थातूर मातूर काम झाले. पदाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचे या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. वितरिका काही ठिकाणी झुडपांनी वेढले आहे. शेतकऱ्यांना पाणी शेतात आणण्यासाठी प्रचंड मेहनत खर्च करावा लागतो. ज्या ठिकाणी वितरिका पाझरत आहे.

बोर नदीला पाणी कमी, पिके धोक्यात
सेवाग्राम - हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सिंचन व्यवस्थेची महत्वाची भूमिका राहिली आहे.यात नदी काठावरील गावातील शेतकºयांनी यशाची किमया सिंचनातून साधली आहे.पण आता नदीचे पाणीच आटायला लागल्याने शेतकरी चिंतीत आहे..खडका,कोपरा,चानकी,देऊळगाव,पिंपळगाव पुढे आष्टा पर्यंत बोर नदी गेलेली आहे.या नदीकाठावरील शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकून शेतात सिंचनाची सोय केली आहे.या मुळे शेतकरी ऊसासह रब्बीत चना व गव्हाचे पिके घ्यायला लागलेले आहे.या पाण्यामुळे तूर व कपाशीला पण फायदा होत होता. या वर्षी पाऊसच कमी झाल्याने जल संकट निर्माण झाले.धरणात जलसाठा कमी असल्याने नदीत पाणी येणार की नाही हा प्रश्न शेतकºयांना सतावित असल्याचे दिसून येते. सेवाग्राम ते हमदापूर या दरम्यान महाकाली तर शिवनगर,जुनोना ते भोसा,आष्टापर्यंत बोरधरणाचे पाणी कालव्यातून सोडल्या जाते.महाकाली धरणाचे पाणी अद्यापही सोडण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे बोरधरणाची परिस्थिती काही वेगळी नाही. कालव्यातून लिकेज पाणी बोर नदी आणि हमदापूर नाल्यात येत असल्याने ओलितासाठी शेतकºयांना फायदा होत असते. यामुळे तीन पिके शेतकरी नक्कीच घेत असतात. खडका,कोपरा व चानकी या शिवारात ३५ ते ४० मोटर पंप नदीवर आहे.कोपरा शिवारातील लोकांनी नदीला पाणीच कमी असल्याने अजूनही चना वा गव्हासाठी कठाण तयार केले नसल्याचे सुलोचना खेरडे या महिलेने सांगितले. पिंपळगाव येथील पुरूषोत्तम नागतोडे यांनी पण पाण्याबाबतची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. बोर नदी आटण्याच्या स्थितीत असून विहिरीत पाणी कमी आहे.नदीच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी अवलंबून आहे.यात पाणी समस्येमुळे ऊस पिक धोक्यात आलेले आहे. गव्हाचा पेरा कमीच राहणार असून चना शेतकरी पेरणार अशी स्थिती आहे. पिंपळगावला बंधारा आहे.तो पाण्यासाठी शेतकऱ्यांनी बंधाऱ्याच्या फळ्यांना छिद्र पाडल्याने पाणी वाहून गेले आता भिस्त आहे ती धरणाच्या पाण्यावर अशी माहिती पुरूषोतम नागतोडे यांनी दिली.तर चानकीचे सरपंच पंढरीनाथ राऊत यांनी पण शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी वापर करावा, असे सांगितले.

Web Title: Difficulty with the farmers taking water through the engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.