जिल्ह्यात धुळपेरणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 10:18 PM2019-06-07T22:18:46+5:302019-06-07T22:19:06+5:30

जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग राजाच्या भरोशावर पेरणी करतो.

Dhubarperni started in the district | जिल्ह्यात धुळपेरणीला सुरूवात

जिल्ह्यात धुळपेरणीला सुरूवात

Next
ठळक मुद्देतळेगाव (टालाटुले), चिकणी (जामणी) येथे कपाशीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (टा.) : जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग राजाच्या भरोशावर पेरणी करतो. गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी धुळपेरणी करीत असल्याने धुळपेरणी शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. मागील वर्षी या भागात ८० टक्के शेतकऱ्याने मृग नक्षत्रात म्हणजे ७ ते १० जूनपर्यंत पेरणी केली व सतत चार दिवस वरूणराजा बरसल्याने या भागातील ८० टक्के पेरण्या साधल्या. ११ व १२ जून रोजी लागवड केलेल्या शेतकऱ्याला पावसाने एक महिन्याची दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे मागावून झालेल्या पेरणीने मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट आली. त्यामुळे दरवर्षी येथील शेतकरी धुळपेरणीला जास्त महत्व देताना दिसत आहे.
उन्हाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी बैलाच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे केली. काही मशागतीची कामे अंतिम टप्प्यात येत आहेत. शेतकरी मान्सूनपूर्व शेतीची कामे आटोपत आहे. यावर्षी हवामान विभागाने १३ जुननंतर मुंबईत पावसाचे संकेत दिल्याने पेरणी १५ जून नंतर होईल असे दिसत आहे. शेतीच्या कामाबरोबर शेतकरी बियाणाच्या दुकानात गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. अजूनही शेतकऱ्यांना बॅँकेतून कर्ज मिळायचे असल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी सावकाराचे दार ठोठावत आहे. कारण पेरणीचा हंगाम येवूनही बॅँकेतून कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी दारोदार फिरताना दिसत आहे.
ज्या शेतकऱ्याजवळ पैशाची सोय आहे ते नगदी पैशाने बियाणे खरेदी करीत आहे व ज्याच्याजवळ पैशाची सोय नाही ते शेतकरी पैसे जुळवण्यासाठी धावपळ करीत आहे. तळेगाव येथील रामुजी बोरीकर या शेतकऱ्याने सहा एकर जागेत ५ जूनला कपाशी पेरणी केली आहे. तर एकुर्ली येथील शेतकरी प्रमोद काटकर यांनी १ जूनला एक एकर जागेत लागवड केली व त्यांची कपाशीही उगवली. दीड एकर चवºया पिकामध्ये मलचींग पेपरवर चवरा असून त्यामध्ये कपाशी लावली व दीड एकर जागेत ६ जूनला धुळपेरणी केली आहे. त्या शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय आहे. या शेतकऱ्यांनी लागवड करण्यास सुरुवात केली असून शेतकरी धुळपेरणीसाठी मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. शेतकरी बियाणे जुळवा जुळव करण्याच्या स्थितीत असून मशागतीचीही कामे आटोपत आहे.

दरवषीप्रमाणे यावर्षीही आपण १ एकरात धुळ लागवड केलेली आहे. १ जूनला लागवड करण्यात आली. कपासी उगवली आहे. त्याला पाणी देण्याचे काम सुरू आहे.
प्रमोद काटकर, शेतकरी, एकुर्ली

Web Title: Dhubarperni started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती