वर्धा मनसे शहराध्यक्षाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:08 PM2018-03-24T12:08:32+5:302018-03-24T12:08:56+5:30

येथील मनसे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याने एका महिलेची बनावट एफडी करून तिला दोन लाख रुपयांनी गंडा घातला.सदर महिलेने बँकेत तक्रार केल्यानंतर बँकेने रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे.

The crime of fraud against Wardha MNS City Council | वर्धा मनसे शहराध्यक्षाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

वर्धा मनसे शहराध्यक्षाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देआरोपीला अटकबनावट शिक्के मारून तयार केली एफडी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील मनसे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याने एका महिलेची बनावट एफडी करून तिला दोन लाख रुपयांनी गंडा घातला.सदर महिलेने बँकेत तक्रार केल्यानंतर बँकेने रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे.
शुभम जळगावकर याने खोटा दस्ताऐवज तयार करून स्टेट बँक आॅफ इंडिया, शिवाजी चौक शाखेतील ग्राहक वैशाली सुनील वकारे यांचे बनावट एफडीचे कागदपत्र तयार केले. शिवाय बँकेचे बनावट शिक्के मारून महिलेकडून एफडीच्या नावे दोन लाख रुपये उकळले. तीन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला. सदर महिला मात्र, याबाबत अनभिज्ञ होती. दरम्यान गुरुवारी (दि.२२ मार्च) वैशाली वकारे या शिवाजी चौक येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेल्या असता त्यांनी एफडी दाखवून चौकशी केली. तेव्हा बँक व्यवस्थापनाने सदर एफडी बनावट असल्याचे सांगितले. महिलेने बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी इंदोर येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेचे स्टेट मॅनेजर गोविंद चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शुभम जळगावकरवर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र्रसिंह यादव करीत आहेत. तपासात अशी आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: The crime of fraud against Wardha MNS City Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा