शेतकऱ्यांकडून मोसंबीची खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:38 PM2018-09-13T23:38:41+5:302018-09-13T23:39:15+5:30

मिहान नागपूर येथे पतंजली मार्फत लवकरच संत्रा, मोसंबी ज्युसचे उत्पादन सुरु होणार आहे. या ज्यूस प्रकल्पाकरिता वर्धा लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांपासून संत्रा मोसंबी खरेदी करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी आचार्य बालकृष्णा यांच्याकडे केली.

Buy coconut from farmers | शेतकऱ्यांकडून मोसंबीची खरेदी करा

शेतकऱ्यांकडून मोसंबीची खरेदी करा

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस यांची आचार्य बालकृष्णा यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मिहान नागपूर येथे पतंजली मार्फत लवकरच संत्रा, मोसंबी ज्युसचे उत्पादन सुरु होणार आहे. या ज्यूस प्रकल्पाकरिता वर्धा लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांपासून संत्रा मोसंबी खरेदी करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी आचार्य बालकृष्णा यांच्याकडे केली.
आचार्य बालकृष्ण यांची खासदार रामदास तडस यांनी नागपूर येथे सदिच्छा भेट घेऊन अनेक विषयावर औैपचारीक चर्चा केली. बालकृष्णा यांनी पंतजलीच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती खासदार रामदास तडस यांना दिली. येत्या काळात लोकसभा क्षेत्रात योग शिबीर तसेच आयुर्वेद चिकित्सेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी गरीब, पिडीत व गरजू आजारी असलेल्या व्यक्तीना योग्य आयुवैदीक उपचार मिळावे याकरिता लोकसभा क्षेत्रामध्ये वर्धा व अमरावती जिल्ह्यात ४० ते ५० आरोग्य शिबीराचे आयोजन करावे अशी सूचना खा. तडस यांनी केली. या शिबीरामुळे गरीब नागरिकांना चांगल्या पध्दतीचा आयुवैदिक उपचार घेणे सहज शक्य होईल असेही खा. तडस यावेळी म्हणाले.
प्रारंभी आचार्य बालकृष्ण यांना सुतगुंडी, शाल व हस्तकलेव्दारे काढलेले चित्र भेट देवून खासदार रामदास तडस यांच्यातर्फे त्याचे स्वागत करण्यात आले.

Web Title: Buy coconut from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.