देशाप्रती पे्रम व स्वत:वर विश्वास बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:20 AM2018-05-13T00:20:42+5:302018-05-13T00:20:42+5:30

देशातील प्रत्येक तरुण, नागरिकांनी देशाप्रती प्रेम व्यक्त केले पाहिजे, व स्वत:प्रती आत्मविश्वास बाळगला पाहिजे. तेव्हाच आपले भविष्य उज्ज्वल होईल. मात्र आज आपण देशाप्रती सकारात्मक भाव ठेवताना दिसत नाही. विदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा दबदबा आहे.

Believe in love for yourself and your country | देशाप्रती पे्रम व स्वत:वर विश्वास बाळगा

देशाप्रती पे्रम व स्वत:वर विश्वास बाळगा

googlenewsNext
ठळक मुद्देकुमार विश्वास : सारथी संस्थेचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील प्रत्येक तरुण, नागरिकांनी देशाप्रती प्रेम व्यक्त केले पाहिजे, व स्वत:प्रती आत्मविश्वास बाळगला पाहिजे. तेव्हाच आपले भविष्य उज्ज्वल होईल. मात्र आज आपण देशाप्रती सकारात्मक भाव ठेवताना दिसत नाही. विदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा दबदबा आहे. अनेकांना भारतीयांच्या गुणवत्तेवर आश्चर्य वाटते. अशा स्थितीत आपण देशाप्रती प्रेम ठेवायलाच हवं, असे प्रतिपादन नामवंत वक्ते, कवी कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.
सारथी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मेघावी भारत युवा महोत्सव २०१८ मध्ये ते शुक्रवारी येथे बोलत होते. या युवा महोत्सवात ‘शून्य से शिखर तक व असंभव से संभव तक’ या विषयावर बोलताना कुमार विश्वास म्हणाले की वर्धा सेवाग्रामच्या भूमित येवून आपण धन्य झालो. गांधी अजूनही आपल्याला योग्य रित्या समजलेले नाहीत. जगात भारताची ओळख गौतम आणि गांधी या दोघांमुळेच आहे. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या साध्या माणसाला इंग्रजाच्या टिसीने दरबान रेल्वे स्थानकावर वर्ण भेदाच्या आधारावर उतरविले नसते तर भारतातील व जगातील इंग्रजी साम्राज्य कधीही संपले नसते. मोहनदास करमचंद गांधी यांची जगाला महात्मा गांधी म्हणून ओळख झाली नसती, असे त्यांनी सांगितले.
इंग्रजी साम्राज्य जगातून नष्ट होण्यामागे गांधीजींनी दिलेला लढ अतुलनीय होता. भारताला पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास लाभला आहे. जगात अशी संस्कृती लाभलेला देश सापडणार नाही. पाच हजार वर्षापूर्वी विश्वबंधुत्वाची कल्पना स्वामी विवेकानंदानी अमेरिकेत पहिल्यांदा मांडली व सारे जग चकीत झाले. संचार माध्यमांचा आज वावर वाढला आहे; मात्र ही संचार माध्यम नसतानाही या देशात अनेक लढे लढल्या गेले. क्रांती झाली. भारतीय माणसाची जगता गुणवत्तेसाठी ओळख आहे. जगात फिरत असताना अनेक देशाचे लोक भारतीयांच्या या गुणवत्तेचा, विद्ववेता आश्चर्याने उल्लेख करतात. अमेरिकेच्या पेंटॉगान मधील १८ पैकी १३ डाूॅक्टर हे भारतीय आहेत. प्रत्येक मनुष्याने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. आपल्या कार्याप्रती आपली श्रद्धा आणि निष्ठा ही अढळ असली पाहिजे. दशरथ मांजी यांचा उल्लेख आजही जगाच्या इतिहासात केला जातो. एक छंन्नी आणि हातोडा याच्या सहायाने पहाड खोदण्याचे काम यांनी केले व जगला त्यांची दखल आजही घ्यावी लागते. हे अतिशय महत्वाची बाब आहे. आज व्यवस्थापन मॅनेजमेंट अभ्यासक्रमात शिकविली जाते. हनुमान खरे मॅनेजमेंट गुरू आहेत. स्वत:जवळचे कोणतेही गुंतवणुक न करता त्यांनी इतिहास घडविला. तरूणांनी अशी महत्वाकांक्षा बाळगली पाहिजे.प्रारंभी कुमार विश्वास यांचा परिचय उरकुडकर यांनी दिला.
देश स्वतंत्र झाला नियोजन नव्हते
१९४७ ला इंग्रजी हा देश सोडून गेले. त्याच्या १० वर्षापूर्वी पासून स्वातंत्र्याचा लढा तिव्र करण्यात आला. देश स्वतंत्र झाल्यावर आपली व्यवस्थापन यंत्रणा असायला हवी होती. परंतु आपण इंग्रजांच्या पद्धतीने १९७७ पर्यंत राज्य चालविले. आपली स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण झाली नाही. पोलीस यंत्रणा निर्माण झाली नाही. इंग्रजाप्रमाणे आपले ठाणे व शिक्षण व्यवस्था सुरू होती. १९७७ मध्ये आणीबाणी नंतर इंदिरा गांधींना अडचणी निर्माण झाल्या तेव्हा कुठे आम्ही कायद्याच्या बदलाकडे वळलो. व शिक्षणाचे खाजगीकरण सरकारीकरण करण्याचे काम सुरू झाले. आपला बराच वेळ राजकीय लोक व राज्यकर्ते यांना शिव्या घालण्यात जातो. आपल्या जीवनाच्या अंगात त्यांचा एक टक्का ही संबंध नाही. त्यांना शिव्या घालणे बंद करून त्यांचा चुका शोधून ठेवावे. एक बटन दाबून त्यांचा निकाल लावण्याची ताकत या देशाच्या नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे आता राजकारण्यांना शिव्या घालण्याचा धंदा बंद करण्याचा संकल्प करा, असे आवाहन कुमार विश्वास यांनी केले.
मेघावी भारत महोत्सवाचे थाटात उद्घाटन
वर्धा- सारथी बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने मेघावी भारत महोत्सवाचे शुक्रवारी स्थानिक इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर थाटात उद्घाटन करण्यात आले. शहीद विरपत्नी अर्चना कळंबे यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. प्रा. अनिल सोले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीयसहायक सुधीर दिवे, जि.प. शिक्षण सभापती अर्चना गफाट, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष अतुल तराळे, या महोत्सवाचे आयोजक अविनाश देव, वर्धा शहर भाजप अध्यक्ष प्रशांत बुरले आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेला मालार्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश देव यांनी केले. यावेळी अर्चना कळंबे यांनी आयोजकांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन शहीद विराच्या पत्नीच्या हस्ते केले. याबद्दल वर्धाकरांना धन्यवाद दिले. व तरूण तरूणींनी भारतीय सैन्य दलात नौकरी स्वीकारावी. देश सेवेसारखे महान कार्य नाही. असे प्रतिपादन केले. आपला पती निवडतांनाही तरूणींनी देश सेवेत आयुष्य वाहिलेला तरूण निवडावा, असे ही आवाहन त्यांनी केले. आपल्या सभोवताल भामरागड निर्माण झाले आहे. त्याचा हेमलकसा करण्यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी खा. रामदास तडस यांनी जिल्हा परिषदेने जि.प. शाळेच्या माध्यमातून बाल वयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी वातावरण निर्माण करून दिले पाहिजे, असे आवाहन केले. आ. डॉ. पंकज भोयर यांनी सारथी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यामातून गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत असलेल्या उपक्रमाची प्रशंसा करून वर्धाकरांनी या सर्व उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सुधीर दिवे यांनी तरूणांनी स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. असा आवाहन करून अशा महोत्सवाचे आयोजन तालुकास्तरावरही सारथी संस्थेने करावे, त्यासाठी तन-मन-धनाने मदत करू असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रेम महिले यांनी केले.

Web Title: Believe in love for yourself and your country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.