सूत्रयज्ञातून बापूंना केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:34 AM2019-02-13T00:34:17+5:302019-02-13T00:34:43+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जनदिनाचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रमात दुपारी १२ वाजता सूत्रयज्ञ आणि सर्वधर्म प्रार्थना, ईशोपनिषदाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला अनेकांची उपस्थिती होती. सुत्रयज्ञात गांधीवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बापूंना अभिवादन केले.

Bapu's greetings from astrologer | सूत्रयज्ञातून बापूंना केले अभिवादन

सूत्रयज्ञातून बापूंना केले अभिवादन

googlenewsNext
ठळक मुद्देरक्षा विसर्जनदिन : सर्वधर्म प्रार्थनेला अनेकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जनदिनाचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रमात दुपारी १२ वाजता सूत्रयज्ञ आणि सर्वधर्म प्रार्थना, ईशोपनिषदाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला अनेकांची उपस्थिती होती. सुत्रयज्ञात गांधीवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बापूंना अभिवादन केले.
महात्मा गांधीजींची हत्या दिल्ली येथे ३० जानेवारी १९४८ ला झाली. भारतीय पंरपरेप्रमाणे तेरवीची प्रथा आहे; पण बापूंनी अशा गोष्टींना आपल्या जीवनात महत्त्व दिले नव्हते. दिल्लीवरून गांधीजींच्या अस्ती आश्रमात त्यावेळी आणण्यात आल्या होत्या. त्याप्रसंगी भारताचे गव्हर्नर मंगलदास पकवासा हे सुद्धा आश्रमात आले होते. आश्रमातून १२ फेब्रुवारी १९४८ ला अस्तीकलश पवनारच्या धामनदीवर आश्रमचे कार्यकर्ते, नई तालिमचे ई. डब्लू. आर्यनायकम्, आशादेवी, शंकर पांडे आदींच्या उपस्थितीत नेण्यात आला होता. त्या ठिकाणी गव्हर्नर मंगलदास पकवासा यांच्यासह आदींच्या हस्ते बापूंच्या अस्ती धामनदीत विसर्जीत करण्यात आल्या. तेव्हापासून १२ फेब्रुवारी हा रक्षा विसर्जनदिन म्हणून पाळल्या जातो. मंगळवारी बापूकुटीच्या आवारात सूत्रयज्ञ पार पडला. त्यानंतर सर्वधर्म प्रार्थना, गिताई वाचन आणि इशोपनिषद झाले. याप्रसंगी आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे, शोभा कवाडकर, अश्विनी बघेल, प्रभा शहाने, रिता हुसैन, जालंधरनाथ, बाबा खैरकार, नामदेव ढोले, प्रशांत ताकसांडे, मिथून हरडे, सिद्धेश्वर उंबरकर, सचिन हुडे, इस्माईल हुसैन आदींची उपस्थिती होती.

Web Title: Bapu's greetings from astrologer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.