रुग्णवाहिकेच्या पायलट व डॉक्टरांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:30 AM2018-10-11T00:30:57+5:302018-10-11T00:32:25+5:30

महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनच्या नेतृत्वात १०८ या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या पायलट व डॉक्टरांनी विविध मागण्यांचे निवेदन कामगार मंत्र्यांना दिले होते.

Ambulance pilot and doctor's property | रुग्णवाहिकेच्या पायलट व डॉक्टरांचा संप

रुग्णवाहिकेच्या पायलट व डॉक्टरांचा संप

Next
ठळक मुद्देमागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष : महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनच्या नेतृत्वात १०८ या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या पायलट व डॉक्टरांनी विविध मागण्यांचे निवेदन कामगार मंत्र्यांना दिले होते. परंतू या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर १२ आॅक्टोबरपासून सर्व पायलट (चालक) व डॉक्टरांनी बेमुदत संपावर जाणार असल्याचे पत्रकातून कळविले आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जनतेला तातडीने आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने महाराष्ट्रात १ मार्च २०१४ पासून १०८ रुग्णवाहिका सेवा सुरु केली. ही सेवा पुरविण्यासंदर्भात शासनाने बी.व्ही.जी इंडिया लि. या कंपनीसोबत करारनामा केला. त्यात सर्व कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार लाभ देण्याचेही नमुद करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात पायलट व डॉक्टर्स मिळून ५ हजार ८०० कर्मचारी कार्यरत आहे.परंतू करारानुसार या कर्मचाºयांना कंपनीकडून लाभ मिळत नाही. या कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन मिळतात, तसेच बारा किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करावे लागते.परंतु जास्त कामाचे वेतन देण्यात येत नाही.या कर्मचाऱ्यांना २०१४ ला नियुक्ती देण्यात आली.मात्र भवीष्य निर्वाह निधीचा लाभ २०१७ पासून लागू केला.या काळात वेतन कपात केली होती.परंतु मार्च २०१४ ते डिसेंंबर २०१६ याकाळातील भरपाई अथवा मोबदला उद्यापही कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. तसेच वेतन पावती मिळत नसल्याने वेतनाचा हिशोब लागत नाही. तसेच कर्मचाऱ्यांचा गणवेश, बुट यासाठी ३ हजार ५०० रुपयाची बेकायदेशीर कपात ेकेली जाते. कर्मचाºयांचा कुठलाही अपघात विमा नाही तसेच त्यांच्या पगारातून कामगार विमा योजने पोटी रक्कम कापुनही विमा योजनेचे कोणतेही फायदे कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत. रुग्णवांिहकेच्या स्वच्छतेची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी पायलटने खर्च केल्यास त्याचा परतावा मिळत नाही. कंपनीचे अधिकारी, सुपरवायजर, मॅनेजर व झोनल मॅनेजर कर्मचाऱ्यावर मानसिक दडपण टाकतात. ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन विश्वासात घेत नाही. ज्या ठिकाणी पायलट व डॉक्टर काम करतात त्या ठिकाणी त्यांना कोणतीही सुविधा पुरविली जात नाही, या समस्यांचा विचार करुन पायलट व डॉक्टरांच्या सुरक्षीत भवितव्याकरिता उपायायोजना करण्याची मागणी महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनच्यावतीने करण्यात आली होती.परंतू याकडे दुर्लक्ष केल्याने आता त्यांनी बेमुदत संपाचे अस्त्र उगारले आहे.
कर्मचाऱ्यांना ना साप्ताहीक,ना राष्ट्रीय रजा
१ मार्च २०१४ पासून राज्यभरात १०८ च्या ९३७ रुग्णवाहीका सुरु करण्यात आल्या. त्यावर २ हजार ३०० पायलट तर ३ हजार ५०० डॉक्टर्स कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कराराप्रमाणे लाभ दिल्या जात नाही. त्यांना साप्ताहीक रजा, राष्ट्रीय सुट्ट्याही दिल्या जात नाही. तसेच जादा कामाचे वेतनही २०१४ पासून दिलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यासांठी आता सर्व कर्मचाºयांनी एकत्र येऊन संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Ambulance pilot and doctor's property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.