हिंगणघाटात ६८ दिवसीय नवकार जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:21 PM2019-07-22T22:21:54+5:302019-07-22T22:22:17+5:30

शहरातील श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात साध्वीश्रींच्या उपस्थितीत ६८ दिवसीय नवकार जापचा प्रारंभ ४ आॅगस्टपासून पासून होणार आहे. छत्तीसगडरत्न शिरोमणी महत्तरा पद विभूषिता प. पू. गुरुवर्या मनोहरश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या सरलमना प.पू. सुभद्राश्रीजी म.सा. नवकार जपेश्वरी प.पू. शुभंकराश्रीजी म.सा., विद्याभिलाषी प.पू. ज्ञानोदयाश्रीजी म.सा., ज्ञानपिपासू प.पू. सिद्धोदयाश्रीजी म.सा. आदि ठाणा ४ यांचे आगमन झाले आहे.

68-day Navkar chant in Hinganghat | हिंगणघाटात ६८ दिवसीय नवकार जप

हिंगणघाटात ६८ दिवसीय नवकार जप

Next
ठळक मुद्दे४ आॅगस्टपासून जैन मंदिरात आयोजन : सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरातील श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात साध्वीश्रींच्या उपस्थितीत ६८ दिवसीय नवकार जापचा प्रारंभ ४ आॅगस्टपासून पासून होणार आहे. छत्तीसगडरत्न शिरोमणी महत्तरा पद विभूषिता प. पू. गुरुवर्या मनोहरश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या सरलमना प.पू. सुभद्राश्रीजी म.सा. नवकार जपेश्वरी प.पू. शुभंकराश्रीजी म.सा., विद्याभिलाषी प.पू. ज्ञानोदयाश्रीजी म.सा., ज्ञानपिपासू प.पू. सिद्धोदयाश्रीजी म.सा. आदि ठाणा ४ यांचे आगमन झाले आहे.
दरवर्षी चातुर्मासादरम्यान हा दरबार आयोजित केला जातो. जैनेतर शुद्धशाकाहारी इच्छुक व्यक्ती कालसर्पयोग दोष निवारण व नवग्रह दोष निवारणार्थ यात सहभागी होऊ शकतात. ४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कालसर्पयोग दोष निवारण व नवग्रह दोष निवारण अनुष्ठान, ५ ला सकाळी ९ वाजता अठरा अभिषेक व श्री नवकार दरबारात पार्श्वप्रभूंची स्थापना, ६ ला सकाळी ९ वाजता कुंभकलश व अखंड दीप स्थापना, नवग्रह दहा दिक्पाल अष्टमंगल स्थापना आणि त्यानंतर ६८ दिवसीय नवकार जापास प्रारंभ होणार आहे. नवकार दरबारात नवकार मंत्राचा सातत्याने जाप चालणार असून दरदिवशी सकाळी ८.१५ ते ९.१५ पर्यंत सामूहिकरीत्या जाप केला जाणार आहे. या दरम्यान प्रतिव्यक्ती कूपन दिले जाणार असून त्याची सोडत दरदिवशी सकाळी प्रवचनानंतर काढली जाणार आहे. सकाळी प्रवचनानंतर आणि सायंकाळी सामूहिक जापानंतर आरती होईल. याचा लाभ सोडतीनुसार दिला जाणार आहे, असे आयोजक अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, उपाध्यक्ष अनिल कोठारी, व्यवस्थापकीय विश्वस्त दिनेशकुमार कोचर, शिखरचंद मुनोत, शांतिलाल कोचर, प्रदीप कोठारी, अरूण कोचर, अशोक गांधी, हरीश कासवा यांनी कळविले आहे. श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टद्वारे आयोजित या कार्यक्रमात जैन समाजातील श्रावकांनी कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश कोचर यांनी केले आहे.
हिंगणघाटातील तेविसावा नवकार दरबार
साध्वी मंडळाद्वारे चातुर्मासाच्या प्रत्येक ठिकाणी नवकार दरबाराचे आयोजन केले होते. भाविक दरबारात तासन्तास बसत नवकार मंत्राचा जाप करतात. हा नवकार दरबार तब्बल ६८ दिवस चालतो. मागील २२ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. दरबारात साध्वीजींनी सोबत आणलेली भगवान पार्श्वनाथ आणि अन्य देवता व गुरूदेवाची प्रतिमा स्थापित केली जाते. आतापावेतो २२ ठिकाणी हा दरबार घेण्यात आला. हिंगणघाट शहरातील हा २३ वा दरबार आहे.

Web Title: 68-day Navkar chant in Hinganghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.