४८ तास लोटले; पण मारेकरी गवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:16 PM2018-09-17T23:16:04+5:302018-09-17T23:16:41+5:30

येथील रहिवासी असलेल्या भारती जांभुळकर यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली. या घटनेला ४८ तासांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही पोलिसांना भारतीचा मारेकरी हुडकुन काढण्यात यश आलेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ६ जणांना ताब्यात घेवून चौकशी केली; पण मारेकºयाचा साधा सुगावाही पोलिसांना लागला नसल्याचे पोलीसही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

48 hours have passed; But the Marekari Gavsaena | ४८ तास लोटले; पण मारेकरी गवसेना

४८ तास लोटले; पण मारेकरी गवसेना

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांची चौकशी : जांभुळकर हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : येथील रहिवासी असलेल्या भारती जांभुळकर यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली. या घटनेला ४८ तासांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही पोलिसांना भारतीचा मारेकरी हुडकुन काढण्यात यश आलेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ६ जणांना ताब्यात घेवून चौकशी केली; पण मारेकºयाचा साधा सुगावाही पोलिसांना लागला नसल्याचे पोलीसही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
भारती जांभूळकर हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलीस यंत्रणेने अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु, घटनेनंतर तिसºया दिवशीही पोलीस आरोपीच्या एका सुगाव्याच्या शोधात असल्याचे दिसून आले. मृतक भारतीचे शवविच्छेदन तज्ञांच्या उपस्थितीत सुमारे सात तास चालले. आतापर्यंतच्या तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रक्तमिश्रीत विविध साहित्याचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविले आहे. भारती हिचा मारेकरी तिच्याच निटकवर्तीयांपैकी कुणी तर नाही ना याचाही शोध सध्या पुलगाव पोलीस घेत आहे. पोलिसांनी तपासादरम्यान कुठलाही व्यत्थय येऊ नये म्हणून मृतकाचे निवास्थान तात्पूर्ते कुलूपबंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जाभुंळकर कुटूंबियांनी अंत्यसंस्कारानंतरच्या तिसºया दिवशीचा धार्मिक विधी घरासमोर मंडप टाकून पार पाडावा लागला. कालपर्यंत पोलिसांनी सुमारे पाच जणांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली होती. तर सोमवारी काहींची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मृतक भारतीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना अद्यापही प्राप्त झाला नसून तो प्राप्त झाल्यावर काहीतरी सुगावा मिळेल अशी अपेक्षा पोलिसांना आहे. मृतक भारतीच्या शव विच्छेदनात अज्ञात इसमाचे डोक्याचे काही केस हाती लागल्याचे पोलीस सुत्रानी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. आरोपीचा शोध घेण्यासाठी सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे मागील दोन दिवसांपासून पुलगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. तर एसडीपीओ कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मुरलीधर बुरांडे यांच्यासह पुलगाव पोलीस सध्या शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.
आरोपी कितीही हुशार असू देत तो काही ना काही सुगावा सोडतोच. तोच आमच्या हातापासून काही अंतरावर आहे. तो आमच्या हाती लागताच आरोपीला जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास सध्या पुलगाव पोलीस व्यक्त करीत आहेत. हे प्रकरण पुढे काय नवीन कलाटणी घेते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.
मृतक भारतीची मुलगी उत्कृष्ट कराटेपट्टू
मृतक भारतीची एकमेव कन्या अपेक्षा ही उत्कृष्ट कराटेपट्टू आहे. अपेक्षा ही आंतरराष्ट्रीय कराटेपटू असून घटनेच्या दिवशी ती शेगाव येथे होती. ती शेगाव येथे कराटेच्या दोन दिवसाच्या खास प्रशिक्षणासाठी गेली होती असे सांगण्यात आले. ती नागपूर येथील एका शाळेत विज्ञान शाखेचे अकरावीचे शिक्षण घेत आहे.

Web Title: 48 hours have passed; But the Marekari Gavsaena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.