तुम्हालाही स्मार्टफोन व्हेकेशनवर जायचंय? 'या' ठिकाणांना भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 01:46 PM2018-12-23T13:46:22+5:302018-12-23T13:48:43+5:30

सध्या स्मार्टफोन म्हणजे लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय. अनेकदा घरात मुल सतत स्मार्टफोन हातात घेऊन बसलयं, हे पाहून ओरडणारे आई-वडिल आता स्वतःच सतत स्मार्टफोनसोबत वेळ घालवताना दिसतात.

Spend some time without cellphone on smartphone vacation | तुम्हालाही स्मार्टफोन व्हेकेशनवर जायचंय? 'या' ठिकाणांना भेट द्या!

तुम्हालाही स्मार्टफोन व्हेकेशनवर जायचंय? 'या' ठिकाणांना भेट द्या!

googlenewsNext

सध्या स्मार्टफोन म्हणजे लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय. अनेकदा घरात मुल सतत स्मार्टफोन हातात घेऊन बसलयं, हे पाहून ओरडणारे आई-वडिल आता स्वतःच सतत स्मार्टफोनसोबत वेळ घालवताना दिसतात. तसं पाहायला गेलं तर या स्मार्टफोनचे अनेक फायदे तर आहेतच पण नुकसानही आहेच. पण तरिदेखील तुम्हाला कोणी सांगितलं की, स्मार्टफोनपासून दूर राहा, तर तुम्ही राहू शकता का? आणि तेही ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेकेशनवर जात असाल तेव्हा. कदाचित तुम्ही अजिबात मान्य करणार नाही. पण हेच जर तुम्हाला कोणी सांगितलं की, तुम्ही स्मार्टफोनपासून लांब राहिलात तर तुम्हाला अनेक अॅडवेंचर्स गोष्टी करता येतील तर मात्र तुम्ही कदाचित थोडासा विचार करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही रिसॉर्ट्सबाबत सांगणार आहोत, जिथे स्मार्टफोन वेकेशनचा ट्रेन्ड आहे आणि जर तुम्ही हे फॉलो केलं तर त्याबदल्यात तुम्हाला अनेक अॅडवेंचर्स आणि सुविधा मिळणार आहे. 

यूएसमधील Wyndham Grand’s रिसॉर्टचे चीफ मार्केटिंग ऑफिसर  Lisa Checchio यांनी सांगितल्यानुसार, अनेक व्यक्तींची अशी इच्छा असते की, काही वेळासाठी स्मार्टफोन लांब ठेवून स्वतःला वेळ द्यावा पण ते फार काळ तसं करू शकत नाहीत. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, वर्ष 2017मध्ये स्मार्टफोन युजर्सवर एक रिसर्च करण्यात आला होता. त्यामधून असं सिद्ध झालं होतं की, 69 टक्के पालक आणि 78 टक्के तरूण मुलं प्रत्येक तासाला आपला स्मार्टफोन चेक करतात. याच गोष्टींचा विचार करून त्यांच्या रिसॉर्टमध्ये स्मार्टफोनपासून लांब राहणाऱ्या लोकांना फ्रीमध्ये स्नॅक्स आणि इतर सुविधा देण्यात येतात. 

Lisa Checchio यांनी सांगितले की, ज्यावेळी आपण वेकेशन प्लॅन करत असतो. त्यावेळी आपल्याला रोजच्या धावपळीपासून शांतता हवी असते. अशातच स्मार्टफोनचा वापर केल्याने व्यक्तीला शांतता लाभत नाही. रिसॉर्ट त्यांच्याकडून स्मार्टफोन्स घेऊन सॉफ्ट पाउचमध्ये जमा करून ठेवतात. हे पाउच हॉटेल स्टाफशिवाय इतर कोणीही ओपन करू शकत नाही. त्यामुळे स्मार्टफोन्स सुरक्षितही राहतात. 

याव्यतिरिक्त रिसॉर्टमध्ये थांबणाऱ्या गेस्टपैकी कोणी टाइम लॉक म्हणजेच, एका ठराविक वेळेसाठी स्मार्टफोन जमा करून ठेवला तर त्यांना राहण्यासाठी 5 टक्के सूट देण्यात येते. आतापर्यंत त्यांच्या फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये असलेल्या रिसॉर्टमध्ये 250 लोकांनी स्मार्टफोन बाजूला ठेवून अनेक अॅडवेंचर्स गोष्टींचा आनंद घेतला. त्यांनी सांगितले की, पुढिल वर्षांपर्यंत Wyndham च्या इतर हॉटेलमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहेत. तरूण आणि लहान मुलांसाठी स्मार्टफोन बाजूला ठेवून मिळालेला वेळ उत्तम प्रकारे कसा कामी लावता येईल याचा विचार करून रिसॉर्टने कॅमेरा, बेडटाइम बुकची सुविधाही देण्यात आली आहे. 

मॅक्सिकोच्या Grand Velas Riviera Nayarit मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिवायसेसचा वापर न करण्यावर Jenga आणि chess यांसारखे गेम्स देण्यात येतात. याचे सिस्टर रिसॉर्ट्स Grand Velas Riviera Maya मध्ये स्मार्टफोन सबमिट करण्यात येतात आणि ते परत मिळवण्यासाठी गेस्टला कमीतकमी चार उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची अट ठेवण्यात येते. 

याव्यतिरिक्त काही रिसॉर्ट असे आहेत, जिथे स्मार्टफोन्सचा वापर करणं पूर्णपणे बॅन करण्यात आलं आहे. आफ्रिकन सफारी Wilderness Resortsमध्ये वाय-फायची सुविधाच देण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे आलेल्या व्यक्ती स्मार्टफोनचा वापरच करू शकत नाहीत. इजिप्तच्या Siwa Oasis मध्ये रूम्समध्ये इलेक्ट्रिसिटीसोबतच वाय-फायची सुविधाही देण्यात आलेली नाही. यामागील त्यांचा मुख्य हेतू म्हणजे त्यांच्याकडे आलेल्या गेस्टनी स्मार्टफोनपासून दूर राहून स्वतःसाठी वेळ देणं हाच असतो. 

Web Title: Spend some time without cellphone on smartphone vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.