चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात सातपुड्याच्या पर्वत रांगा पावसाळ्यात हिरवी शाल पांघरतात. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात आल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही. 

Related image

चिखलदऱ्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते. याशिवाय याठिकाणी पंचबोल पॉर्इंटचे अद्भुत सौंदर्य पाहावयास मिळते. उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. येथे कॉफीचा बागा असून खोल दरीला लागूनच पाच उंच डोंगरांची शृंखला आहेत. देव पॉर्इंटवरही नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडते. याठिकाणी महाभारताविषयी रोचक माहितीदेखील मिळते. येथे एक भीमकुंड असून ते सुमारे ३ हजार ५०० फूट खोल आहे. शिवाय एक मनमोहक सुंदर असा धबधबाही आहे. पौराणिक कथेनुसार भीम कीचकाचा वध केल्यानंतर त्याला खोल दरीत फेकून याच धबधब्याखाली स्नान केले होते. पर्यटकांना येथे नक्षीदार आणि पोलाद, कांस्य आणि तांब्याच्या तोफा पाहायला मिळतात. या पर्यटन स्थळाचा शोध ब्रिटिशांनी १८२३ मध्ये लावला होता.

Related image

या पर्यटनस्थळाला पौराणिक महत्त्व आहे. द्वापर युगात अज्ञातवासात असलेले पाच पांडवांनी काही काळ येथे घालवला होता. कीचकने द्रौपदीसोबत दुर्व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता, तो इथेच. राग अनावर झाल्याने भीमने त्याचा वध करून त्याला चिखलदरा येथील खोल दरीत फेकून दिले होते. अशी आख्यायिका सांगितली जाते. 
 या पावसाळ्यात अशा नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पर्यटनस्थळी अवश्य भेट द्यावी.   Also Read : ​मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !
                   ​​ : आपण पुण्यातील ‘या’ आकर्षक ठिकाणांना भेट दिली का?

Web Title: It is a 'This', which appears in the valley of Kashmir, a tourist destination in Maharashtra!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.