लाइव न्यूज़
 • 04:25 PM

  नवी दिल्ली : हज यात्रेच्या सबसिडीचा फायदा एजंट उचलत होते, या कारणासाठी बंद केली सबसिडी, गरीब मुस्लिमांसाठी करणार वेगळी व्यवस्था- मुख्तार अब्बास नकवी.

 • 04:07 PM

  गडचिरोली - स्वस्त धान्य दुकानातील 14 क्विंटल तांदूळ विक्रीसाठी जाताना पकडला, स्थानिक गुन्हे शाखेची देसाइगंज येथे कारवाई

 • 04:02 PM

  हज यात्रेचं अनुदान यंदापासूनच बंद, केंद्र सरकारचा निर्णय

 • 03:47 PM

  मुंबई : कमला मिल आग प्रकरण - मोजोस विस्ट्रोचा माल युग तुलीला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी.

 • 03:30 PM

  हरयाणामध्ये पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय.

 • 02:58 PM

  मुंबई हल्ल्याच्या 9 वर्षांनंतर मोशो येथे आला आहे. याठिकाणच्या पुनर्विकासाबाबत आम्ही त्याला माहिती देत आहोत. तो खूपच भावनिक झाला आहे - रब्बी कोज्लोव्सकी

 • 02:25 PM

  पुणे - दौंड शहराच्या दोन भागात एका माथेफिरु व्यक्तीकडून गोळीबार, दोघांचा मृत्यू.

 • 02:11 PM

  सांगली : बापू बिरु वाटेगावकर यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन. इस्लामपुरात घेतला अखेरचा श्वास.

 • 01:52 PM

  दिल्लीः मनी लाँड्रिंगप्रकरणी कोठडीत असलेल्या योगेश मित्तल यांना दिल्ली हायकोर्टाकडून जामीन मंजूर.

 • 01:49 PM

  श्रीनगर : बिलाव अहमह याच्या अटकेवरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ.

 • 01:47 PM

  मुंबई : थोड्याच वेळात मोशे छाबड सेंटर नरीमन हाऊस येथे पोहोचणार आहे.

 • 01:45 PM

  सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याविरोधात भाजपाच्या नगरसेविकेची तक्रार. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 • 01:41 PM

  मुंबई : प्रजासत्ताकदिनी प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली, विरोधकांच्या संविधान रॅलीला तिरंगा रॅलीनं उत्तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची माहिती.

 • 01:38 PM

  नवी मुंबई- रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने मृतदेह अर्धा जळाला. उलवे येथिल घटना.

 • 01:36 PM

  कोरेगाव-भीमा प्रकरण हे मोठं षडयंत्र. हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त. सुत्रांची माहिती. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू. निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना.

All post in लाइव न्यूज़