‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाला शून्य प्रतिसाद, कचराकोंडीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:20 AM2018-08-03T03:20:25+5:302018-08-03T03:20:35+5:30

ठाणे शहरात तीन ठिकाणी प्रत्येकी १०० मेट्रिक टन कचऱ्यावर ‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना निविदाकारांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला असल्यामुळे या निविदेस मुदतवाढ देण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे.

 Zero response to 'plasma' technology, garbage screw | ‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाला शून्य प्रतिसाद, कचराकोंडीचा पेच

‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाला शून्य प्रतिसाद, कचराकोंडीचा पेच

Next

- नारायण जाधव

ठाणे : ठाणे शहरात तीन ठिकाणी प्रत्येकी १०० मेट्रिक टन कचऱ्यावर ‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना निविदाकारांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला असल्यामुळे या निविदेस मुदतवाढ देण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे.
दैनंदिन कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली नाही, तर अनुदान बंद करण्यात येईल, असा इशारा नगरविकास विभागाने राज्यातील ३८४ स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. त्यानंतर, सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचरा विल्हेवाटीसाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे महापालिकेने प्रयत्न करूनही शहरातील मोठ्या सोसायट्या आणि हॉटेलसह मॉलने त्यांच्या कचºयावर प्रक्रिया करण्यास फारसा प्रतिसाद दिलेला नाही. हे कमी म्हणून की काय, आता याअंतर्गत महापालिकेने तीन ठिकाणी विकेंद्रित पद्धतीने १०० मेट्रिक टन क्षमतेच्या कचºयावर प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे. इच्छुक संस्थांना जागाही महापालिकाच देणार आहे. १५ वर्षांच्या मुदतीकरिता परिचालन, देखभाल, दुरुस्ती या अटींवर हे प्रकल्प महापालिका चालवण्यास देणार आहे. मात्र, यासाठीच्या निविदांना एकाही संस्थेने प्रतिसाद दिलेला नाही, यामुळे आता फेरनिविदा मागवण्याचा व योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे शहरात घनकचºयाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनत चालला आहे. महापालिकेने डम्पिंग ग्राउंड बंद करणे बंधनकारक आहे. रहिवाशांकडूनही कचरा प्रक्रियेला सहकार्य केले जात नाही. आता तर महापालिकेच्या प्रक्रिया योजनेला कंपन्यांचा प्रतिसाद नाही. यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
ठाणे महापालिकेनेही ज्या सोसायट्यांचे क्षेत्रफळ पाच हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे किंवा रोज १००० किलोहून कचरा निर्माण करणाºया सोसायट्या, मॉलचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सोसायट्यांकडून यास तीव्र विरोध झाल्याने अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून महापालिकांशी चर्चा केली आणि या निर्णयास एक महिन्याची मुदतवाढ दिली. ती आता संपली आहे. यामुळे महापालिका कचरा संकलन, विघटनाची कार्यवाही अधिक तीव्र करण्याच्या विचारात आहे.

काय आहे प्लाझ्मा तंत्रज्ञान?
प्लाझ्मा तंत्रज्ञानांतर्गत शहरात जमा होणाºया सर्व प्रकारच्या कचºयाचे वर्गीकरण न करता तो एक मशीन टाकून अतिउच्च तापमानात जाळला जातो. यामुळे निर्माण होणाºया राखसदृश पदार्थापासून विटा किंवा तत्सम वस्तू तयार करून त्यांचा वापर करता येऊ शकतो.

प्रतिसाद न मिळण्याची कारणे कोणती?
प्लाझ्मा तंत्रज्ञानांतर्गत कचरा जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. त्यामुळे प्रकल्प राबवणाºयांचा खर्च वाढतो. तसेच सर्वात गंभीर बाब म्हणजे यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे कचरा जाळून तो नष्ट करण्याचे हे तंत्रज्ञान म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखे आहे. त्याला देशात कुठेही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक ठिकाणी त्याचे केवळ प्रयोग सुरू आहेत.

Web Title:  Zero response to 'plasma' technology, garbage screw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे