कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:58 AM2017-12-30T02:58:29+5:302017-12-30T02:58:41+5:30

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे.

Water closure for two days in Kalyan-Dombivli | कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद

कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद

googlenewsNext

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यात अपयश आलेले असतानाच पाण्याच्या नियोजनातील आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी ही कपात लागू करून अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सुरू झाली आहे. ही कपात १५ जुलैपर्यंत म्हणजे साडेसहा महिने राहणार आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून १ जानेवारीपासून ही पाणीकपात होईल. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका उल्हास नदी पात्रातून पाणी उचलते. यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बारवी व आंध्र धरणात मुबलक पाणीसाठा आहे. तरीही कपात लागू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज ३४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना एमआयडीसी दररोज ३० दशलक्ष लीटर पाणी पुरवते. एमआयडीसीही उल्हास नदीतून पाणी उचलते. त्यामुळे त्यांना आणि पर्यायाने २७ गावांना किती पाणी कपात लागू असेल, ते अजून स्पष्ट झालेले नाही.
>ठाण्यात पाण्याचे मीटर
ठाणे : ठाणे शहरातील पाण्याची गळती रोखम्यासाठी जलवाहिन्या बदलण्याची योजना पालिकेने हाती घेतली होती. पण त्यांच्या देखभालीच्या अटी आणि प्रत्येक जोडणीवर बसवले जाणारे मीटर हे नियम पाहून त्याला कोणत्याच कंत्राटदाराने प्रतिसाद न दिल्याने स्मार्ट मिटरिंग योजना गुंडाळण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
त्याऐवजी ठाणेकरांना दिल्या जाणाºया पाण्याची मोजणी करण्यासाठी मीटर लावले जाणार आहे. या मीटरचे प्रत्येकी आठ ते दहा हजार रूपये ठाणेकरांच्या पाणी बिलांतून तीन टप्प्यांत वसूल केले जाणार होते. नव्या प्रस्तावात तो भुर्दंड ठाणेकरांवर न टाकण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
>सर्वांनाच फटका
उल्हास नदीपात्रातून ४८ लाख नागरिकांची तहान भागविली जाते. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका, अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका, २७ गावे, ठाण्याचा काही भाग, कळवा, मुंब्रा, मीरा-भाईंदर, नवी मुंबईच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने होणाºया या कपातीचा फटका या सगळ््यांना बसणार आहे.

Web Title: Water closure for two days in Kalyan-Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.