ठाणे - पालघर जिल्ह्यातील अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक आता पूर्णवेळ पदी ; शासन आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:41 PM2018-10-02T19:41:55+5:302018-10-02T19:53:44+5:30

ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्हह्यातील सुमारे २६ शिक्षकांना आता रिक्त् असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदांवर आकृतीबंध निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात समायोजन अटी व शर्तींच्या अधीन करण्याचा शासन आदेश उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १ आॅक्टोंबर रोजी जारी केला आहे. शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध अदद्याप अंतिम झालेला नसल्यामुळे १२ फेब्रुवारी २०१५च्या शासन निर्णयानुसार ठाणे, पालघरच्या सुमारे २६ सहायकांचे पूर्णवेळ सहायकांच्या रिक्त जागी समायोजन करण्याचा शासन निर्णय जारी झाला

Thane-part-time lab assistant in Palghar district is now full-time; Government orders issued | ठाणे - पालघर जिल्ह्यातील अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक आता पूर्णवेळ पदी ; शासन आदेश जारी

या सहायकांना आधीच ही दिवाळी भेट मिळाल्यामुळे त्यांच्यात आनंदोत्सव साजरा होत आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देअर्धवेळ प्रयोगशाळा सहायकाना काढून टाकण्याचा प्रयत्न सुरू होतात्यांचे वेतनही बंद करण्यात आलेया समायोजनासाठी लागू होणाऱ्या अटी शर्तींमध्ये पूर्णवेळ सहायकाचे पदीठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्हह्यातील सुमारे २६ शिक्षकांना आता रिक्त् असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदांवर


ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना रिक्त असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांच्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करावे, असा शासन निर्णय १ आॅक्टोंबर रोजी जारी करण्यात आला. यामुळे या सहायकांना आधीच ही दिवाळी भेट मिळाल्यामुळे त्यांच्यात आनंदोत्सव साजरा होत आहे.
या अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकाना काढून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यांचे वेतनही बंद करण्यात आले होते. पण त्यांची नोकरी टिकवण्यासह त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जोरदार प्रयत्न करून या अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकां नोकरी कायम ठेवली. याशिवाय आता पूर्णवेळ रिक्त असलेल्या जागी त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्याचा निर्णय अखेर राज्य शासनास घ्यावा लागल्याचे या सहायकांमध्ये ऐकायला मिळत आहे.
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्हह्यातील सुमारे २६ शिक्षकांना आता रिक्त् असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदांवर आकृतीबंध निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात समायोजन अटी व शर्तींच्या अधीन करण्याचा शासन आदेश उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १ आॅक्टोंबर रोजी जारी केला आहे. शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध अदद्याप अंतिम झालेला नसल्यामुळे १२ फेब्रुवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार ठाणे, पालघरच्या सुमारे २६ सहायकांचे पूर्णवेळ सहायकांच्या रिक्त जागी समायोजन करण्याचा शासन निर्णय जारी झाला आहे.
या समायोजनासाठी लागू होणाऱ्या अटी शर्तींमध्ये पूर्णवेळ सहायकाचे पद त्या शाळेत प्रयोगशाळा सहायकाचे एकाकी पद असावे, समायोजन होण्यापूर्वीच्या वेतनाची मागणी करणार नाही, असे हमीपत्र संबंधीत अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक यांच्याकडून घेण्यात येईल. पूर्णवेळ समायोजन करताना प्रथम तालुक्यामध्ये रिक्त असलेल्या संस्था, शाळांमध्ये समायोजना होणे अपेक्षित आहे. तालुक्यामध्ये पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायक पद रिक्त नसल्यास जिल्ह्यामध्ये संबंधीत सहायकाचे समायोजन करण्यात यावे, आदी अटी शर्तींस अनुसरून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २६ अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचे उद्धवस्त झालेले संसार बचावले असून त्यासाठी शिक्षक सेनेला शासनाशी जोरदार लढा द्यावा लागल्याच्या दावा शिक्षक सेनेचे कोकण प्राप्त अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केला आहे. सुमारे दोन वर्षांपासून या अर्धवेळ सहायकाना बिनपगारी काम करावे लागत आहे. त्यांना आता या निर्णयामुळे न्याय मिळवून देणे शक्य झाल्याचे म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Thane-part-time lab assistant in Palghar district is now full-time; Government orders issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.