राजकारणात वारसदारीची फॅशन, नितीन गडकरी यांनी डागली तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:12 AM2018-07-03T04:12:53+5:302018-07-03T04:13:06+5:30

माझा मुलगा राजकारणात नाही. तो माझ्या नावाने माझा राजकीय वारसदार बनावा, अशी माझी इच्छा नाही. अलीकडे राजकीय वारसदारीची फॅशनच होत चालली आहे.

Political fashion, Nitin Gadkari has a fashionable fashion | राजकारणात वारसदारीची फॅशन, नितीन गडकरी यांनी डागली तोफ

राजकारणात वारसदारीची फॅशन, नितीन गडकरी यांनी डागली तोफ

Next

मीरा रोड : माझा मुलगा राजकारणात नाही. तो माझ्या नावाने माझा राजकीय वारसदार बनावा, अशी माझी इच्छा नाही. अलीकडे राजकीय वारसदारीची फॅशनच होत चालली आहे. सर्वच नेते बनत आहेत, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय वारसदारीचा समाचार घेतला.
भार्इंदरच्या उत्तन येथील केशवसृष्टीतल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत सोमवारी दीक्षान्त समारोह पार पडला. यावेळी गडकरी बोलत होते. या सोहळ्याला खासदार डॉ. नरेंद्र जाधव, खा.डॉ. विनय सहस्रबुद्धे, रेखा महाजन, विजय गिरकर, अरविंद रेगे, रवींद्र साठे, रवी पोखरणा यांच्यासह मीरा-भार्इंदर भाजपाचे आमदार, महापौर, नगरसेवक आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, माझा खरा राजकीय वारसदार हा भाजपा, रा.स्व. संघ असल्याचे सांगत कार्यकर्त्याला पुढे आणले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
समाजातील जे शोषित, पीडित, दलित आहेत, जे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या अशा दरिद्री नारायणांना देव मानून त्यांची निरंतर सेवा करा. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळेल तेव्हा आपलं कार्य पूर्ण होईल. महात्मा गांधी, पं. दीनदयाळ उपाध्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे हेच विचार होते. मनात स्वच्छ भावनेने केलेल्या सेवेसमोर जात, धर्म, प्रांत, भाषेच्या भिंती तुटून पडतात. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा करायला प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.
आपली वर्तणूक, काम, ओळख यातून नेतृत्वाचे मूल्यमापन होते. ज्यांना गावात, शहरात कोणी विचारत नाही, असे दिल्लीत नेते बनले आहेत. चांगल्या नेतृत्वासाठी प्रगल्भता, गुणवत्ता, लोकांना भेटणे हे ठीक आहे; पण ज्ञानदेखील महत्त्वाचे आहे. आज हाच विरोधाभास देशात पाहायला मिळतो, तो दूर करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही पक्षात जा. सर्व पक्षांत चांगले नेते झाले, तर लोकशाहीत गुणात्मक सुधारणा येईल. लोकतंत्र मजबूत झाले तर देशाचा विकास होईल, असे ते म्हणाले.

म्हणून मी निवडणूक जिंकतो
नंगे, उचक्के, लोफर हे माझ्यासोबत असल्याने मी निवडणूक जिंकतो, असे सांगतानाच कॅश, कास्ट व क्रिमिनलवर मात करण्याची ताकद तुमच्यात असून प्रामाणिकपणे काम करा, असा उपदेश नितीन गडकरी यांनी यावेळी दिला.

Web Title: Political fashion, Nitin Gadkari has a fashionable fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.