पोलीस अधिका-याचा जाच; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:49 AM2018-01-12T01:49:20+5:302018-01-12T01:49:29+5:30

चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिका-याच्या जाचाला कंटाळून बुधवारी सायंकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणाची सुसाईट नोट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

Police officer's investigation; The youth's suicide attempt | पोलीस अधिका-याचा जाच; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस अधिका-याचा जाच; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

- वसंत भोईर

वाडा : चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिकाºयाच्या जाचाला कंटाळून बुधवारी सायंकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणाची सुसाईट नोट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
कृपाल पाटील (२८) असे त्या तरूणाचे नाव असून तो एटीएममध्ये सुरक्षा रक्षक आहे. त्याचे तरुणीवर प्रेम होते. तिचे दोघांशी प्रेम असल्याचे कळल्यावर त्याने तिला मारहाण केली. तरुणीच्या कुटुंबियांनी हे प्रकरण कुडूस पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणवारे यांच्या कानावर टाकले. रणवारे यांनी या प्रकरणी त्याला २२ डिसेंबर २०१७ रोजी दोन लाखांची लाच मागितली. तसेच पैसे दिले नाहीत तर गुन्हे नोंदविण्याची धमकी दिली. त्याने उसनवारी करुन २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत दोन टप्प्यात पैसे दिले. त्यानंतरही रणवारेने त्रास दिल्याने या तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे नोटमध्ये लिहिले आहे.

रणवारे निलंबित
वाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला नसला तरी, सुसाईट नोटची दखल घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी रणवारेला तडकाफडकी निलंबित केले आहे. एसपींच्या आदेशानंतर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली.

Web Title: Police officer's investigation; The youth's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस