राष्ट्रवादीने घातले भाजप सरकारचे चौथे वर्षश्राध्द, कार्यकर्त्यांनी केले मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:43 PM2018-10-31T14:43:28+5:302018-10-31T14:44:41+5:30

ठाणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. यावेळी सरकारचे श्राध्द घालत, कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

Nationalist Congress Party's fourth year, BJP workers protested | राष्ट्रवादीने घातले भाजप सरकारचे चौथे वर्षश्राध्द, कार्यकर्त्यांनी केले मुंडण

राष्ट्रवादीने घातले भाजप सरकारचे चौथे वर्षश्राध्द, कार्यकर्त्यांनी केले मुंडण

Next
ठळक मुद्दे२०१९ मध्ये सरकार बुडविण्याचा केला निर्धार१२ कोटी जनता धडा शिकवेल

ठाणे - भाजप सरकारच्या कारकीर्दीला चार वर्षे झाली आहेत. या चार वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे, बेरोजगारी, महिलांवरी अत्याचार, सामाजिक तेढ, राज्याची खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे महाराष्ट्र असुरिक्षत, अशांत, असह्य आणि अर्थशून्य झाला आहे. असा आरोप करीत ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यात भाजप सरकारचे चौथे वर्षश्राद्ध घालण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करुन फडणवीस सरकारचा निषेध केला.
                 फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करु न चार वर्षे झाली आहेत. आज महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘ नही नरेंद्र.. नही देवेंद्र; ये सरकार है ठगेंद्र’, एवढी माणसे कशाला? सरकारच्या श्राद्धाला, भारत मे शोर हैइ चौकीदार चोर है... फ्रान्स मे शोर है भाजप सरकार चोर है, अशा घोषणा देत मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी विसर्जन घाटावर सरकारचे विधीवत श्राद्ध घातले. यावेळी पिंडदान देखील करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांनी मुंडण करुन २०१९ मध्ये सरकार बुडवण्याचा निर्धार केला.
यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये महिलांशी संबधीत गुन्हयांचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. येथील माय भगिनींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. नागपूरमध्येच गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. मुंबईसारख्या शहरात मंगळवारीच एकाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील जनता असुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. दलित- सवर्ण, ओबीसी- मराठा अशी सामाजिक तेढ या सरकारने निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतमालाला हमीभाव दिला जात नाही. परिणामी, शेतकरी पुन्हा आत्महत्या करीत आहेत. पदवीधर तरु णांना रोजगार मिळेनासा झाला आहे. राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योगांवर संकट घोंघावत आहे. या सर्व प्रकाराला फडणवीस सरकारच जबाबदार आहे, महाराष्ट्राची वाटचाल विकासाऐवजी विनाशाकडे होत आहे, असा आरोप करुन आगामी वर्षात या सरकारला महाराष्ट्रातील १२ कोटी जनता बुडवून टाकेल, असा आशावाद व्यक्त केला.



 

Web Title: Nationalist Congress Party's fourth year, BJP workers protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.