माथेरानचे रस्ते चिखलात

By admin | Published: September 23, 2014 01:52 AM2014-09-23T01:52:53+5:302014-09-23T01:52:53+5:30

माथेरानमधील टपाल नाका ते रिझर्व्ह बँक हॉलिडे होम या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे

Matheran road mud | माथेरानचे रस्ते चिखलात

माथेरानचे रस्ते चिखलात

Next

मुकुंद रांजणे, माथेरान
माथेरानमधील टपाल नाका ते रिझर्व्ह बँक हॉलिडे होम या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता अशी दयनीय अवस्था झाल्यामुळे नगरपरिषदेचे एकूण दीड कोटी चिखलात गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मुख्य रस्त्यावरून बाराही महिने पर्यटकांची तसेच घोडा, हातरिक्षांची वर्दळ सुरू असते.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असलेले माथेरान जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे नगरपरिषदेने २०१३ मध्ये पावसाळ्यात ठेकेदाराला सदर रस्त्याचे काम दिले होते. हा रस्ता पेव्हर ब्लॉकच्या बनविणेकामी निविदा मागविल्यानंतर मंजूर निविदाधारकांकडून रस्त्याचे काम चालू केले होते. मूळ अंदाजपत्रकामध्ये पेव्हर ब्लॉकची तरतूद होती. मात्र सनियंत्रण समितीने दिलेल्या निर्देशानुसार पेव्हरब्लॉकऐवजी ट्रेडीशनल मटेरियल वापरून डब्लूबीएम रस्त्याचे काम सुरू केले. पाचशे पन्नास मीटर लांबीच्या या रस्त्याची अंदाजपत्रकीय रक्कम १,४९,७६,४२० इतकी होती.
ठेकेदारास २०१४ अखेरपर्यंत १,२०,३२,२९४ रु. इतके बिल अदा केले होते. त्यानंतर त्याचे सर्व बिलांची उर्वरित रक्कम जुलै अखेरपर्यंत अदा केल्याचे समजते. रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे उर्वरित बिलांची रक्कम अदा केली नसल्याचे नगरपरिषदेने सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांना माहितीच्या अधिकाराखाली जून महिन्यात दिलेल्या अर्जावर उत्तर दिले होते.
माथेरान पर्यावरणाला बाधा येवू नये, यासाठी इथे उत्खनन करण्याची परवानगी नाही. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्बंध घातलेले आहेत. ठेकेदाराने झाडांलगतचे दगड मातीचे उत्खनन करून रस्ता बनविल्यामुळे सदर परिसर खड्डेमय झाला आहे.

Web Title: Matheran road mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.