केडीएमटीचे १४ बसथांबे गायब

By admin | Published: September 22, 2014 12:44 AM2014-09-22T00:44:05+5:302014-09-22T00:44:05+5:30

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रम अधिकारी-कर्मचारी-लोकप्रतिनिधी यांच्यातील वादविवाद व उघडकीस आलेल्या विविध घोटाळ्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे़

KDMT 14 buses missing | केडीएमटीचे १४ बसथांबे गायब

केडीएमटीचे १४ बसथांबे गायब

Next

राजेंद्र वाघ, शहाड
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रम अधिकारी-कर्मचारी-लोकप्रतिनिधी यांच्यातील वादविवाद व उघडकीस आलेल्या विविध घोटाळ्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे़ सध्या या दोन्ही शहरांतील १४ बसथांबे गायब झाल्याने तर काही गंजल्यामुळे कोसळू लागले आहेत.
गेल्या वर्षभरापासून परिवहन उपक्रमांतर्गत असलेले गाळेगाव, मोहना कॉलनी, वडवली रेल्वे गेट, मोहना रोडवरील दोन, भवानीनगर सर्कल, लालचौकी, शेलारनाका, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, क्रीडा संकुल, सोनारपाडा असे सुमारे १४ ठिकाणी असलेले बसथांबा गायब झाले आहेत. न्यायालयाजवळ असलेल्या बसथांब्यावर अनधिकृत मुद्रांक विक्रेते व टंकलेखक यांनी तर बिर्ला कॉलेज रोड, शास्त्रीनगर, तिसगाव नाका, सिंडिकेट, आयरे रोड व इतर बसथांब्यांवर फेरीवाल्यांनी आक्रमण केले आहे. (वार्ताहर)

Web Title: KDMT 14 buses missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.