गांजा, चरसचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:38 AM2018-07-10T04:38:03+5:302018-07-10T04:38:17+5:30

अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका अट्टल तस्कराला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार किलो गांजा आणि तीन किलो चरस जप्त करण्यात आले आहे.

 Hemp, grazing stock, seized | गांजा, चरसचा साठा जप्त

गांजा, चरसचा साठा जप्त

Next

कल्याण - अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका अट्टल तस्कराला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार किलो गांजा आणि तीन किलो चरस जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात याआधीही सात गुन्हे दाखल आहेत.
पश्चिमेतील डॉ. आंबेडकर रोड परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सतीश सोनवणे आणि साहेबराव माळी यांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे सापळा लावून हुसेन आबू खान ऊर्फ कमांडो (६१, रा. मदारछल्ला जमादारवाडा) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या एका बॅगेत चरस, गांजा व रोख रक्कम आढळली. ती जप्त केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) लक्ष्मण तांबे, उपनिरीक्षक राहुल व्हरकाटे, हवालदार सुरेश पाटील, हवालदार मनीष राजगुरू, नाईक सतीश सोनवणे, सचिन साळवी, सुनील पाटील, साहेबराव माळी, शिपाई व्ही.एम. बच्छाव, महिला पोलीस नाईक वर्षा राजगुरू आणि अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस नाईक काळुराम शिरोते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, मुंब्रा शहरात अमली पदार्थांच्या विक्रीचे व्यवहार होतात. पोलिसांनी अनेकदा अमली पदार्थांचा साठा येथून जप्त केला आहे.

काश्मीरमधून येतो माल

काश्मीर येथून हे अमली पदार्थ मुंब्रा येथे आणण्यात आले होते. हुसेनने ते तेथून कल्याणमध्ये आणले. हुसेनला कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी माध्यमांना दिली.

Web Title:  Hemp, grazing stock, seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.