शुल्लक कारणांवरून हल्लेखोरांचा तरूणास दगडाने ठेचून मारण्याचा जीवघेणा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:24 PM2019-02-19T22:24:36+5:302019-02-19T22:27:46+5:30

भिवंडी : शहरालगत चाविंद्रा येथील धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या दोन तरूणांना शुल्लक वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण ...

A fatal attempt to crush the young man's perfume with stones | शुल्लक कारणांवरून हल्लेखोरांचा तरूणास दगडाने ठेचून मारण्याचा जीवघेणा प्रयत्न

शुल्लक कारणांवरून हल्लेखोरांचा तरूणास दगडाने ठेचून मारण्याचा जीवघेणा प्रयत्न

Next
ठळक मुद्देमोठमोठे दगड विनीकेतच्या डोक्यावर व हातापायावर मारलेजीवघेणा प्रयत्न झाला मोबाईलमध्ये कैदशुल्लक कारणावरून केला दोघांवर हल्ला

भिवंडी : शहरालगत चाविंद्रा येथील धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या दोन तरूणांना शुल्लक वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाला दगडाने ठेचून मारण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. मोठमोठ्या दगडाच्या माराने तो तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
विनिकेत मोरे असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून तो ब्राम्हणआळीतील संकेत सुरेश वल्लाळ याच्यासह सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास धाब्यावर जेवण करण्यासाठी जात होता. दरम्यान लघुशंकेसाठी अपना वजनकाटा येथे दोघेजण थांबले असता त्या ठिकाणी तीन ते चार जणांचे टोळके आले. त्यांनी शुल्लक वाद करीत दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यापैकी विनिकेत मोरे हा जमिनीवर पडल्याचे पाहून हल्लेखोरातील एकाने परिसरांतील मोठमोठे दगड उचलून विनीकेतच्या डोक्यावर व हातापायावर मारून जीवघेणा प्रयत्न केला. दगडाच्या माराने विनीकेत जागीच बेशुध्द झाला होता. त्यास जागीच टाकून मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांनी पलायन केले. या घटने बाबत पोलीस सुमारे दोन तास काही माहिती नसल्याचे सांगत होते. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.त्या आधारे तालुका पोलीस ठाण्यात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेतील मारहाणीचा क्रुर प्रकार पहाता हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जखमींच्या कुटूंबीयांनी केली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी चाविंद्रा चौकी गेल्या काही वर्षापासून बंद असल्याने या परिसरांतील घडामोडीवरील पोलीसांचे लक्ष नसल्याची माहिती परिसरांतील नागरिकांनी दिली.

Web Title: A fatal attempt to crush the young man's perfume with stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.