ठाण्यात अँब्युलन्समध्ये स्फोट, एका दिवसाचा चिमुकला मृत्यूमुखी

By admin | Published: December 11, 2015 07:57 AM2015-12-11T07:57:08+5:302015-12-11T17:27:24+5:30

ठाण्यातील वर्तक नगरमधील वेदांता हॉस्पिटलच्या संकुलामध्ये दोन खासगी अँब्युलन्सना स्फोटानंतर आग लागून एका दिवसाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

The explosion in the Thane Ambulance, one day's chimukala died | ठाण्यात अँब्युलन्समध्ये स्फोट, एका दिवसाचा चिमुकला मृत्यूमुखी

ठाण्यात अँब्युलन्समध्ये स्फोट, एका दिवसाचा चिमुकला मृत्यूमुखी

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. ११ - ठाणे येथील वर्तक नगरमधील वेदांता हॉस्पिटलच्या संकुलामध्ये दोन खासगी अँब्युलन्सना स्फोटानंतर आग लागून एका दिवसाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या दुर्दैवी घटनेत डॉक्टर व नर्सही जखमी झाले आहेत. अॅब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे रुग्णवाहिकेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भिवंडीतील काल्हेरमध्ये राहणआरे मनिष जैन यांच्या एक दिवसाच्या मुलाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथेही त्याच्यावर उपचार शक्य नसल्याने गुरूवारी मध्यरात्री डॉक्टरांनी त्याला मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार पहाटेच्या सुमारास त्या चिमुरड्याला घएऊन रुग्णवाहिका निघत असतानाच स्फोटाचा मोठ्ठा आवाजा झाला व एम एच ०४ ई एल ९२१६ आणि एम एच ४३ ५३१८ या दोन रुग्णवाहिकांना आग लागली. ऑक्सिजन सिलेंडर्या स्फोटामुळे ही आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थली तातडीने धाव घेत आग विझवली. मात्र हा स्फोट इतका भीषण होता, की रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. इतकंच नाही तर स्फोटाच्या आवाजाने बाजूच्या इमारतीच्या काचांना तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे.
या भीषण आगीत डॉ. भवनदीप गर्ग (३०) २१ टक्के भाजले आहेत तर नर्स लीजा सी चाको (२८) ७ टक्के भाजली आहे. दोघांनाही ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: The explosion in the Thane Ambulance, one day's chimukala died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.