सिव्हीलमधला सिटी स्कॅन मशीनचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:54 AM2019-02-01T00:54:17+5:302019-02-01T00:54:30+5:30

रुग्णांची वणवण थांबणार; शासनाकडून रुग्णालयाची मागणी मान्य

The exhaustion of the City Scan Machine in the Sivimal Complex | सिव्हीलमधला सिटी स्कॅन मशीनचा वनवास संपला

सिव्हीलमधला सिटी स्कॅन मशीनचा वनवास संपला

Next

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची सिटी स्कॅनसाठी होणारी वणवण आता थांबणार आहे. कारण, राज्य शासनाने ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार एक सिटी स्कॅन मशीन दिली असून जवळपास १२ वर्षांनी रुग्णालयाला ती मिळाली आहे. सद्य:स्थितीत ती रुग्णालयात दाखल झाली असून लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शहरासह मुरबाड, शहापूर ग्रामीण भागांसह पालघर जिल्ह्यातून आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतून रुग्ण उपचारार्थ येतात. तसेच रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज ५०० च्या आसपास रुग्ण येतात. मात्र, येथे उपचारार्थ दाखल होणाºया रुग्णांना सिटी स्कॅन करण्यासाठी वणवण करावी लागत होती.

ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. कैलास पवार यांना रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. तिची दखल घेऊनच शासनाने मंगळवारी सिटी स्कॅन मशीन रुग्णालय प्रशासनाच्या स्वाधीन केली आहे.

बारा जणांची टीम
सिटी स्कॅन विभागासाठी १० ते १२ जणांची टीम तयार केली जाणार आहे. त्यानुसार, त्यांना कामाचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी वेगळी अशी कोणतीही भरती करण्याची गरज भासणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मंगळवारीच मशीन रुग्णालयात दाखल झाली आहे. भविष्यात रुग्णालय स्थलांतर करताना तो विभाग स्थलांतर करावा लागणार नाही, तशा जागी निश्चित केली आहे. या विभागासाठी लागणाºया सोयीसुविधांची पूर्तता करण्याचे काम सुरू असून हा विभाग तातडीने कार्यान्वित करण्यात येणार आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे रुग्णालय

Web Title: The exhaustion of the City Scan Machine in the Sivimal Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.