कट रचून माझ्या मुलाचा अपघात घडवून आणल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 04:47 AM2018-11-14T04:47:09+5:302018-11-14T04:47:38+5:30

वडिलांचा आरोप : न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे, बसचालकावर व्यक्त केला संशय

Due to my son's accident by accident, after death | कट रचून माझ्या मुलाचा अपघात घडवून आणल्याने मृत्यू

कट रचून माझ्या मुलाचा अपघात घडवून आणल्याने मृत्यू

googlenewsNext

अंबरनाथ : येथील म्हाडा कॉलनी परिसरातील एमआयडीसी रोडवर दुपारी एका बसच्या धडकेत कॉलेजमधील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बस चालकावर संशय व्यक्त करून या प्रकरणी तपास करण्याची मागणी मृत तरूणाच्या वडिलांनी केली होती. मात्र या प्रकरणात तपास केला जात नसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.

२६ आॅक्टोबर २०१८ मध्ये दुपारी सव्वा वाजता दीपक मानवतकर यांचा १८ वर्षाचा मुलगा तेजेश मानवतकर हा आपला मित्र चंद्रशेखर कुशवाह याच्यासोबत साऊथ इंडियन कॉलेजमधून परीक्षा देऊन घरी परतत होता. यावेळी म्हाडा कॉलनीजवळ त्यांची दुचाकी आली असता एका भरधाव बसने त्यांना मागून धडक दिली. यावेळी बस रिकामी होती. अपघातात दोघे तरूण बसखाली आल्याचे लक्षात येताच बसचा चालक जयवंत पवार याने पळ काढला. या अपघातात जखमी झालेला तेजेश आणि चंद्रशेखर या दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर बसच्या चालकाला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला जामिनावर सोडण्यात आले. तर काही दिवसातच अपघातग्रस्त बसही सोडून देण्यात आली. मात्र या प्रकणरात तेजेश यांचे वडील दीपक यांनी बस चालकावर संशय व्यक्त केला आहे.

कट रचून हा अपघात घडविल्याचा त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. अपघाताच्यावेळी दुचाकीला जी धडक बसली ती बसच्या उजव्या बाजूने बसली. यावरुन स्पष्ट होते की बसचालक ज्या बाजूला बसला होता त्याच बाजूने धडक बसल्याने हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर दोन्ही मुले जिवंत असतानाही बस चालकाने त्यांना रूग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळ काढला. त्याने या मुलांना रूग्णालाात हलविले असते तर त्यांचा जीव वाचला असता असेही या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणात बसचालकाची चौकशी केल्यास नेमका हा कट का रचण्यात आला याची माहिती पुढे येऊ शकते असे तक्रारीत नमूद केले आहे. या अपघाताची चौकशी केल्यास हा सर्व प्रकार कट रचून केल्याचे समोर येईल असे मानवतकर यांनी स्पष्ट
केले. आपल्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही म्हणून मानवतकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. मुख्यमंत्री कुठला निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

संघर्ष सुरूच राहणार
मानवतकर हे दिव्यांग असून तेजेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आमच्या जगण्याची उमेदच निघून गेली आहे. मात्र मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्यासाठी आपला संघर्ष सुरु राहील, असे मानवतकर यांनी स्पष्ट केले. सरकार न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Due to my son's accident by accident, after death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.