दिवा ते कल्याणदरम्यान उद्या रात्रकालीन ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:28 AM2019-05-03T04:28:48+5:302019-05-03T04:29:01+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा ते कल्याणदरम्यान शनिवार, ४ मेच्या मध्यरात्री १ वाजल्यापासून ते रविवार पहाटे ४.३०पर्यंत दोन्ही दिशेकडील मार्गांवर पॉवर, ट्रॅफिक ब्लॉक असेल

Daily night block between Diva to Kalyan | दिवा ते कल्याणदरम्यान उद्या रात्रकालीन ब्लॉक

दिवा ते कल्याणदरम्यान उद्या रात्रकालीन ब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा ते कल्याणदरम्यान शनिवार, ४ मेच्या मध्यरात्री १ वाजल्यापासून ते रविवार पहाटे ४.३०पर्यंत दोन्ही दिशेकडील मार्गांवर पॉवर, ट्रॅफिक ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान ठाकुर्ली स्थानकावर नवीन पादचारी पुलाचे ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर टाकण्यात येतील.

ब्लॉकदरम्यान धिम्या मार्गावरून कल्याण दिशेकडे जाणारी लोकल दिवा आणि कल्याणदरम्यान जलद मार्गावर धावेल. त्यामुळे कोपर आणि ठाकुर्लीत ती थांबणार नाही. तर, कल्याणहून पहाटे ३.२९ला सुटणारी कर्जत-सीएसएमटी लोकल कल्याण आणि दिवा या स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावेल. ती कोपर, ठाकुर्ली येथे थांबणार नाही.

Web Title: Daily night block between Diva to Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे