डहाणूतील इंटरनेट सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:05 PM2019-01-31T23:05:21+5:302019-01-31T23:05:37+5:30

तालुक्यातील बँका, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांना फटका

Dahunu internet service jam | डहाणूतील इंटरनेट सेवा ठप्प

डहाणूतील इंटरनेट सेवा ठप्प

Next

डहाणू : येथील बीएसएनएलने वीज बिल न भरल्याने मंगळवारी महावितरणने कारवाई करुन टेलिफोन एक्सचेंजचा पुरवठा खंडीत केला. या कारवाईने तालुक्यातील बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा ठप्प पडली असून त्याचा फटका तालुक्यातील बँका, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापने, यांना बसला आहे.

डहाणू टेलिफोन केंद्राने मागील काही महिन्यांपासून महावितरणची देयके अदा केली नाहीत. महावितरणचे ५ लाख ९४ हजार ९०० रुपयांचे वीजिबल थकवले आहे. त्यामुळे २९ जानेवारी पासून या केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सुरुवातीला दुरध्वनी केंद्राने जनरेटरच्या आधार घेत काही काही काळ सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यासाठी लागणारा इंधन खर्च झेपेनासा झाल्याने ही व्यवस्था जुजबी स्वरुपाची ठरली. याचा फटका सरावली, दांडी, डहाणू , धाकटी डहाणू, देदाळे, घोलवड, चारोटी, उधवा, वाणगाव, बोर्डी, चिंचणी, चिखला, झाई, धुंदलवाडी, गंजाड, सरावली या गावांना बसला आहे.

याबाबत वसई, कल्याण व मुंबई येथील उच्च कार्यालयांना कळविण्यात आले असून महावितरण कंपनीचे थकीत बील भरण्यात येणार आहे व लवकरच सेवा पुर्ववत होईल.
-डी एस उपाध्याय,
उपमंडळ अभियंता, डहाणू बीएसएनएल

Web Title: Dahunu internet service jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.