ठाणे महापालिकेतील मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव ३८ वर्षांच्या सेवेनंतर सेवा निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 05:39 PM2018-07-31T17:39:15+5:302018-07-31T17:41:26+5:30

ठाणे महापालिकेत सलग ३८ वर्षे सेवा करणारे मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव हे मंगळवारी सेवा निवृत्त झाले. महापौरांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप समारंभ साजरा झाला.

Chief Security Officer of Thane Municipal Corporation Shukram Jadhav retired after 38 years of service | ठाणे महापालिकेतील मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव ३८ वर्षांच्या सेवेनंतर सेवा निवृत्त

ठाणे महापालिकेतील मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव ३८ वर्षांच्या सेवेनंतर सेवा निवृत्त

Next
ठळक मुद्दे२० वर्षे ११ आयुक्तांचे बॉडीगार्ड म्हणून कामअनेकांचे डाळे पानावले

ठाणे - मागील ३८ वर्षे ठाणे महापालिकेत कार्यरत असलेले मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. अतिशय हसतमुख चेहऱ्याचे, कोणाशी अदबीने बोलणे हा त्यांचा स्वभाव त्यामुळे आज त्यांच्या सेवानिवृत्त होण्याने संपूर्ण सुरक्षा यंत्रणाच हळवी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यांच्या समवेत विविध विभागातील एकूण १३ कर्मचारी सुध्दा सेवानिवृत्त झाले.
घोडबंदर भागातील मानपाडा गावात राहणारे शुक्राम जाधव हे मागील ३८ वर्षापूर्वी ठाणे महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर अनेक चढ उतार करीत ते            मुख्य सुरक्षा अधिकाºयापर्यंत पोहचले. याच कार्यकाळात त्यांनी मागील २० वर्षात ११ आयुक्तांचे बॉडीगार्डचे कामही त्यांनी यशस्वीरित्या पेलले. बुधवारी त्यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या एक दिवस आधीच म्हणजेच ३१ जुलै रोजी ते महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. कामाचा शेवटचा दिवस असतांनासुध्दा ते नेहमीप्रमाणे महापालिकेत विविध ठिकाणची सुरक्षा यंत्रणा तपासण्याचे काम करीत होते. विविध ठिकाणी जाऊन त्यांनी सुरक्षा यंत्रणेची माहिती सुध्दा घेतली. सतत हसमुख असलेले जाधव हे पालिकेत तसे सर्वांचेच लाडके, त्यांच्या याच स्वभावामुळे सुरक्षा बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांनासुध्दा त्यांनी आपलेसे केले होते. सैदव कामाच्या ठिकाणी तत्पर असेच त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे आज तमाम सुरक्षा रक्षकांनी जाधव यांना त्यांच्याच खास शैलीत निरोप दिला. अनेकांचे डोळे यावेळी पाणावले होते.
                 दरम्यान शुक्राम जाधव यांच्या समवेत भरत राणे (लेखाधिकारी - शिक्षण विभाग), नीना गोळे (अ वर्ग लिपीक), विमल गायकवाड (प्रसाविका), उमा रेड्डी (जोडारी), गौतम खरात ( जमादार), सुरेश भिलारे (जमादार), हरी सुपे ( बिगारी), काशिराम मोरे (बिगारी), चंद्रा सारस (सफाई कामगार), नाहिद अंजुम सिराज मुजावर (मुख्याध्यापिका), सावित्री यादव (उपशिक्षिका) आणि कला महाडीक (शिक्षिका) हे सुध्दा मंगळवारी सेवा निवृत्त झाले.


 

Web Title: Chief Security Officer of Thane Municipal Corporation Shukram Jadhav retired after 38 years of service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.