खड्डेमुक्तीसाठी पुढील वर्षीचा मुहूर्त! आयुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:05 AM2018-07-31T03:05:24+5:302018-07-31T03:06:50+5:30

तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. यासंदर्भातील विदारक चित्र ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून लोकमतने समोर आणल्यानंतर पालिका प्रशासनाने याची दखल घेतली आहे.

 Next year's emblem for emission of pits Officials took office | खड्डेमुक्तीसाठी पुढील वर्षीचा मुहूर्त! आयुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

खड्डेमुक्तीसाठी पुढील वर्षीचा मुहूर्त! आयुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

googlenewsNext

ठाणे : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. यासंदर्भातील विदारक चित्र ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून लोकमतने समोर आणल्यानंतर पालिका प्रशासनाने याची दखल घेतली आहे. पालिका आयुक्तांनीसुद्धा लोकमतच्या वृत्तात तथ्य असल्याचे अधिका-यांसोबतच्या आढावा बैठकीत सोमवारी मान्य केले. या वृत्ताची दखल घेत, पुढील वर्षी ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यांतून कसा टाळता येईल, यासाठीची पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहरात दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, खड्ड्यांवरून वातावरण तापलेले असते. यंदा ते घडणार नसल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु, तो पावसाने खोटा ठरवला आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे दिसून आले. ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून रस्त्यांची खरी अवस्था जनतेसमोर आणण्याचा लोकमतने प्रयत्न केला.
महापालिकेच्या सर्व्हेनुसार शहरात १६०७ खड्डे पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे क्षेत्रफळ ३४९४ चौमी एवढे आहे. यातील १४८३ खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाने केला असून केवळ १२८ खड्डे भरणे शिल्लक असल्याचे म्हटले आहे. परंतु, ही संख्या तिपटीने जास्तीची आहे. असे असले तरी महापालिकेने किमान शहरात रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मोहीम उघडली आहे.

- पावसाने उसंत घेतल्याने खड्ड्यांच्या डागडुजीची कामे आता वेगाने सुरू केल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. सोमवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आढावा बैठकीत या मुद्यांवर अधिकाºयांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर तोडगा कसा काढता येईल, यावर अभ्यास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षी ठाणेकरांना खड्ड्यांचा प्रवास कसा टाळता येईल किंवा ते पडले तर कोणत्या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बुजवता येतील, यावर आतापासूनच चर्चा सुरू केली आहे.

Web Title:  Next year's emblem for emission of pits Officials took office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे