पाणीकपातीच्या वेळापत्रकाची प्राधिकरणाकडून ऐशीतैशी; बदलापूरकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:17 AM2019-06-19T01:17:19+5:302019-06-19T01:17:26+5:30

भोंगळ कारभारामुळे संतापाचे वातावरण

Ashiktashi from the authority of water supply schedule; Badlapurkar Told | पाणीकपातीच्या वेळापत्रकाची प्राधिकरणाकडून ऐशीतैशी; बदलापूरकर त्रस्त

पाणीकपातीच्या वेळापत्रकाची प्राधिकरणाकडून ऐशीतैशी; बदलापूरकर त्रस्त

Next

बदलापूर : गेल्या सहा महिन्यांपासून निमूटपणे पाणीकपात सहन करणाऱ्या बदलापूर शहरातील नागरिकांना आता जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका बसत आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक पाळले जात नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.
बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जानेवारीपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यात मार्च महिन्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने कूपनलिका आटल्या आहेत. अशावेळी नागरिकांना फक्त जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यावरच अवलंबून रहावे लागते.

मार्च अणि एप्रिल महिन्यात पाणीटंचाईमुळे जीवन प्राधिकरणाने आपले पाण्याचे वेळापत्रक बदलले होते. शहरातील क्षेत्रफळाचे चार भागात विभाजन करून सोमवार आणि शुक्र वारी १५-१५ तासांची पाणीकपात लागू केली होती. त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या अतिरिक्त ३ दशलक्ष लिटर पाण्याला मंजुरी मिळाल्याने पाणीकपातीत दिलासा मिळाला होता. मात्र पाऊस लांबल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेली पाणी कपात सुरूच आहे. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका आता नागरिकांना बसत असल्याने पाणीकपातीत भर पडत आहे.

बदलापूरमधील वीज वितरण व्यवस्था खिळखिळी झाल्याचे सातत्याने समोर येत आहे. भोंगळ कारभाराने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
दहा दिवसांपासून दररोज मध्यरात्री खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. मध्यरात्री तासनतास अंधारात काढावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रिमझिम पावसातच ही अवस्था असेल तर चार महिने काय होणार, असा सवाल उपस्थित करत महावितरणच्या अभियंत्यांची उचलबांगडी करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.

विजेच्या समस्येत वाढ
बदलापूरमध्ये यावर्षी विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बदलापूर पश्चिमेतील जवळपास दीड लाख लोकसंख्येला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली, मांजर्ली, वडवली, वालीवली, हेंद्रे्रपाडा, बाजारपेठ, रमेशवाडी, सोनिवली आणि बदलापूर गावाला महावितरणच्या भोंगळ कारभाराचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Ashiktashi from the authority of water supply schedule; Badlapurkar Told

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.