Anant Deshpande will be honored with the Dombivlit Tejas Award | अनंत देशपांडे यांना डोंबिवलीत तेजस पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार

ठळक मुद्देडोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे देण्यात येतो पुरस्कार२० जानेवारी रोजी पेंढरकर सभागृह टिकळनगर शाळेत होणार सोहळा

डोंबिवली: सरस्वती पेरणारा माणूस अशी ज्यांची ओळख असणारे अर्थात अनंत देशपांडे यांना यंदाचा टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे देण्यात येणारा ‘तेजस’ पुरस्कार जाहिर झाला आहे. गेली १२ हून अधिक वर्षे ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह म्हणुन कार्यरत असून ‘विज्ञानं जनहिताय’ या ध्यासाने प्ररित असझा-या देशपांडे यांचे १ हजार ६०० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.११०० हून अधिक भाषणांमधून त्यांनी विज्ञान हा विषय अधिकाधिक सोपा करुन सांगितला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल डोंबिवलीतील जून्या शैक्षणिक संस्था अशी ख्याती असलेल्या टिळकनगर शिक्षण मंडळ प्रसारक या संस्थेतर्फे पुरस्कार २० जानेवारी रोजी शाळेच्या पेंढरकर सभागृह, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ६ वाजता प्रदान करण्यात येणार आहे. मंडळाच्या अध्यक्षा प्रा. शुभदा जोशी यांच्या हस्ते त्याचे वितरण केले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या कार्याध्यक्षा सविता टांकसाळे, कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे, डॉ. महेश ठाकूर आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्या सोहळयाला शहरातील विज्ञानपे्रमींसह अबालवृद्धांनी आवर्जून यावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.