भिवंडीत अग्नितांडव; कार्गो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाला भीषण आग

By नितीन पंडित | Published: January 23, 2024 06:34 PM2024-01-23T18:34:20+5:302024-01-23T18:55:28+5:30

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

A massive fire broke out at Krishna Cargo Company in Ganaraj Compound in Bhiwandi | भिवंडीत अग्नितांडव; कार्गो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाला भीषण आग

भिवंडीत अग्नितांडव; कार्गो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी: तालुक्यातील अंजुरफाटा चिंचोटी मार्गावर असलेल्या कालवार गावच्या हद्दीतील गणराज कंपाउंडमध्ये असलेल्या कृष्णा कार्गो या ट्रान्सपोर्ट कंपनीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या गोदामात कच्चे धाग्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशम दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अजून समजू शकले नाही. ती आज एवढी भयानक होती की दोन ते तीन किलोमीटर दुरून आगीचे लोळ दिसत होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: A massive fire broke out at Krishna Cargo Company in Ganaraj Compound in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.