97 मुले स्वगृही : पालकांच्या चेहऱ्यांवर ‘मुस्कान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:47 AM2017-08-10T05:47:39+5:302017-08-10T05:47:39+5:30

97 children's homage: 'smile' on parents' face | 97 मुले स्वगृही : पालकांच्या चेहऱ्यांवर ‘मुस्कान’

97 मुले स्वगृही : पालकांच्या चेहऱ्यांवर ‘मुस्कान’

Next

- पंकज रोडेकर  
ठाणे : आॅपरेशन मुस्कान-३ अंतर्गत ठाणे शहर पोलिसांनी हरवल्यानंतर बालसुधारगृहात पालकांच्या मायेशिवाय जीवन जगणाºया बालकांकडून मिळालेल्या तोडक्यामोडक्या माहितीच्या आधारे त्यांच्या पालकांचा शोध घेत त्यांना पुन्हा मायेचे छत्र मिळवून दिले आहे. त्यामुळे ९७ बालकांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहºयावर ‘मुस्कान’ परत आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, स्वगृही परतलेल्या बालकांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भारत सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्यालयात शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली (गुन्हे) पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या स्तरासह ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत १ जुलैपासून एक महिन्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. त्यानुसार, ठाणे शहरात नाहीतर जिल्ह्यातील हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन ९७ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. मिसिंग व अपहरण झालेली ७४, बालकामगार १६ आणि बस तसेच रेल्वेस्थानक परिसरात (दुर्लक्षित) ७ मुले सापडली. यामध्ये ० ते चौदावर्षीय मुलांचा समावेश आहे. तसेच या सर्व मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करताना त्यांचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाच जण परराज्यातील

आॅपरेशन मुस्कान-३ अंतर्गत परराज्यातील पाच बालकांच्या पालकांचा शोधण्यात यश आले. यामध्ये उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांतील प्रत्येकी दोन मुलांचा समावेश आहे. तर, एक गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१६ बालकामगारांची सुटका
आॅपरेशन मुस्कान-३ ही मोहीम सुरू असताना ठाणे शहर पोलिसांनी बालकामगार आयुक्त आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने शहरातील कळवा, राबोडी आणि उल्हासनगर येथे छापे टाकून १६ बालकामगारांची सुटका केली आहे.

७ मुले परतली घरी
बस तसेच रेल्वेस्थानक परिसरात दुर्लक्षित असलेल्या ७ बालकांना घरी धाडण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये तीन मुले आणि चार मुलींचा समावेश आहे.

आॅपरेशन मुस्कान-३ या मोहिमेत ९७ बालकांच्या पालकांचा शोध घेण्यात यश आले. यामध्ये ५७ मुले आणि ४० मुलींचा समावेश आहे. यातील बहुसंख्य बालके ही राज्यातील आहेत.
- ए.एस. चवरे,
पोलीस उपनिरीक्षक,
ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट

Web Title: 97 children's homage: 'smile' on parents' face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.