शशांक केतकरच्या आयुष्यात पुन्हा फुलणार प्रेमाची पालवी ?

 • First Published :16-February-2017 : 18:41:58 Last Updated at: 16-February-2017 : 19:08:18

 • ऑनलाइन लोकमत

  मुंबई, दि. 16 - 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता  शशांक केतकरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची कळी खुलल्याची चर्चा आहे. शशांकने त्याच्या फेसबुकवर 'तिच्या'सोबतचा फोटो अपलोड केल्यामुळे शशांक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. ही 'ती' कोण आहे याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असली तरी, स्वत: शशांकने या नात्याबद्दल अजून तरी मौन बाळगले आहे. 
   
  शशांकसोबतच्या फोटोमधल्या तरुणीचे नाव प्रियांका ढवळे असल्याचे समजत असून, तिने सुद्धा तिच्या फेसबुक अकाऊंटवर दोघांचा एकत्र फोटो अपलोड केला आहे. त्यामुळे तेजश्री प्रधान आयुष्यातून गेल्यानंतर पुन्हा एकदा शशांकच्या आयुष्यात प्रेमाची पालवी फुलली आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेच्या चित्रीकरणावेळी शशांक आणि तेजश्री मनाने परस्परांच्या जवळ आले. 
   
  टीव्हीच्या पडद्यावरील हे आदर्श जोडपे ख-या आयुष्यातही लग्नाच्या नात्यात बांधले जावे, अशी तमाम चाहत्यांची इच्छा होती. अखेर 8 फेब्रुवारी 2014 रोजी पुण्यात दोघे लग्नबंधनात अडकले. पण वर्षभरातच त्यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या. दोघे आज स्वतंत्र राहतात. अजूनही त्यांच्यात घटस्फोट झाला नसला तरी पुण्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या असून, लवकरच शशांकच्या आयुष्यात तुम्हाला नवीन जोडीदार दिसू शकतो. 


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS