० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये ( पुरुष किंवा महिला) असा पराक्रम करणारी रोहमालिया ही जगातील पहिली गोलंदाज ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 04:31 PM2024-04-25T16:31:16+5:302024-04-25T16:31:51+5:30

whatsapp join usJoin us
Indonesia women’s cricketer Rohmalia created a world record, became the first player to pick seven wickets and concede zero runs in any form of cricket, including men's and women's | ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम

० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडोनेशियाची महिला क्रिकेटपटू रोहमालिया ( Rohmalia ) हिने मंगोलियाविरुद्धच्या पाचव्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी केली. रोहमालियाने तिच्या ३.२ षटकांत एकही धाव न देता ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे तिने ३ षटकं निर्धाव फेकली.  


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये ( पुरुष किंवा महिला) असा पराक्रम करणारी रोहमालिया ही जगातील पहिली गोलंदाज ठरली आहे. तिच्या उल्लेखनीय गोलंदाजीमुळे मंगोलियाचा संपूर्ण संघ १६.२ षटकांत २४ धावांत तंबूत परतला. यापैकी १० धावा या अतिरिक्त होत्या. इंडोनेशियाने हा सामना १२७ धावांनी जिंकला. मंगोलियाचे सहा फलंदाज शून्यावर बाद झाले, तर कर्णधार त्सेंडरसन एरियुत्सेत्सेगने सर्वाधिक ७ धावा केल्या. इंडोनेशियाकडून नी पुतू आयू नंदा साकारिनीने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली आणि संघाला ५ बाद १५१ धावांपर्यंत पोहोचवले. 


7/1 - केथ डॅबेंग्वाझ ( वेस्टर्न्स), २००६ ( पुरुष प्रथम श्रेणी) 
7/1 - जॅनेट बर्गर्झा ( आमला), १९६६ ( महिला प्रथम श्रेणी) 
7/1 - इस्टर मॅबोफानाझ ( ईगल्स), २०२२( महिला ट्वेंटी-२०) 

Web Title: Indonesia women’s cricketer Rohmalia created a world record, became the first player to pick seven wickets and concede zero runs in any form of cricket, including men's and women's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.