तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यालयावर गोळीबार, दोघांचा मृत्यू

  • First Published :11-January-2017 : 21:43:21

  • ऑनलाइन लोकमत

    कोलकाता, दि. 11 - पश्चिम बंगालच्या पश्चिमी मिदनापूर जिल्ह्यात तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी खडगपूरमध्ये टीएमसीच्या कार्यालयावर गोळीबार केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.

    हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.काही दिवसांपूर्वी टीएमसी कार्यकर्त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केला होता. चिटफंड घोटाळ्यात सीबीआय चौकशी आणि आणि यामध्ये टीएमसी नेत्यांना झालेल्या अटकेविरोधात भाजपाच्या कार्यालयांना आग लावली होती.   

     

vastushastra
aadhyatma