बोगस टेलिफोन एक्स्चेंज; पाचव्या आरोपीला अटक

  • First Published :20-June-2017 : 02:02:34

  • लोकमत न्यूज नेटवर्क

    लातूर : दोन बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज उभारून सरकारची जवळपास १६ कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीला सोमवारी पहाटे अटक केली. रविवारी रात्री हैदराबादेतील दोघांना ताब्यात घेतले होते. तिघांनाही लातूरच्या न्यायालयाने सोमवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    येथील प्रकाश नगर, राजीव गांधी चौक परिसर आणि शाम नगरमध्ये भाड्याच्या इमारतीत बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज उभारण्यात आले होते. पोलिसांनी सोमवारी पहाटे सुदामन दगडू घुले (४०, रा. रोट्टे अपार्टमेंट, सोलापूर) यास अटक केली. रवी साबदे, शंकर बिरादार यांनी हैदराबाद व सोलापूर येथील साथीदारांच्या मदतीने बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज उभारले होते. त्यावरून देश-विदेशात फोन सुरू होते. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या गोरखधंद्यात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. शुक्रवार ते सोमवार या कालावधीत एकूण ५ आरोपींना एटीएस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. संजय केरबावाले हा फरार आहे.

    अटकेतील रवि साबदे व शंकर बिरादार यांच्या माहितीवरून हैदराबादमधील कुलबाग परिसरातून फैज मोहम्मद व इब्राहीम रशिद यास रविवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS