काय सांगता; दुचाकीपेक्षा आता सायकल महाग...! मग ती तरी कोठे परवडते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 04:41 PM2022-04-29T16:41:20+5:302022-04-29T16:41:28+5:30

कच्चा माल महाग झाल्याने सायकल उत्पादन निम्म्यावर

What do you say Bicycles are more expensive now than two-wheelers ...! Then she can afford it! | काय सांगता; दुचाकीपेक्षा आता सायकल महाग...! मग ती तरी कोठे परवडते !

काय सांगता; दुचाकीपेक्षा आता सायकल महाग...! मग ती तरी कोठे परवडते !

Next

सोलापूर : इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गत वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे दर जवळपास २५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यामुळे अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिकल वाहनांना पसंती देत आहेत. तर वाहने सोडून चक्क सायकल वापरण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याचे महत्त्व उमगलेले आहे. त्यामुळे विशेषतः महिलावर्ग व लहान मुले या वर्गातून सायकलींस विशेष मागणी आहे. तसेच इलेक्ट्रिक सायकलचे फायदे अनेक असल्याने, खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत सायकलला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. सायकलच्या किमती वाढल्याने आता सायकलही परवडेनाशी झाली आहे. मागील वर्षभरात सायकलच्या किमतीत वीस ते तीस टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

-----

स्टीलसह प्लास्टिकही महागले

पेट्रोल, डिझेलच्या दराबरोबरच लोखंड, प्लास्टिक, रबर, कच्च्या मालासह फिनिशिंग मटेरियलच्या किमती वाढल्यामुळे सायकलच्या किमतीतही वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत स्टीलचे दर दुप्पट झाले, तर निकेल अडीचपट महाग झाले आहे. याशिवाय क्रोमिक ॲसिड आणि क्रोम सॉल्टसारखे केमिकल्स आणि पेंट्सचे दर सातत्याने वाढत आहेत. नैसर्गिक रबर आणि कार्बन ब्लॅकही महाग झाले आहे.

---

कोरोनानंतर महागाई वाढली

कोरोना महामारीच्या तडाख्यातून सावरल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांना रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढत्या महागाईचा फटका बसू लागला आहे. या युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. आता कंपन्यांनी हा बोजा ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे.

---

सायकलच्या किमती कोरोनानंतर १० टक्क्यांनी वाढल्या

लोखंड, प्लास्टिक, रबर यासारख्या वस्तू महाग झाल्या आहेत. पेट्रोल, डिझेलची दरवाढ होत असल्याने सायकलच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. सुट्टीचा काळ असल्याने लहान मुलांच्या सायकलींना मागणी आहे.

---

कोणती सायकल कितीला?

  • साधी सायकल -७०००- ८००० रुपये.
  • फॅन्सी सायकल- १५०००-१७००० रुपये.
  • गिअर सायकल – १२,५००- १५,००० रुपये
  • इलेक्ट्रिक सायकल – ३०,०००- १,३०,००० रुपये
  • हायब्रीड सायकल – १००००-२०,००० रुपये
  • लहान मुलांची सायकल- ४००० ते ५००० रुपये

---

काय म्हणतात सायकल विक्रेते

इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे गत वर्षभरात सर्वच प्रकारच्या सायकलींच्या किमती वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. बरेच दिवस सायकलींच्या भावात वाढ झाली नव्हती. ही वाढ अपेक्षित होती. इतर वस्तूंचे ज्या प्रमाणात भाव वाढले आहेत

- सायकल विक्रेते, नवी पेठ, सोलापूर

--

Web Title: What do you say Bicycles are more expensive now than two-wheelers ...! Then she can afford it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.