सोहळा कार्तिकीचा... नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:21 AM2023-11-23T05:21:01+5:302023-11-23T05:27:09+5:30

कार्तिकी एकादशी ; दर्शन रांगेतून निवडला मानाचा वारकरी

Varkari The couple from Nashik district was honored with the official Mahapuja along with the Deputy Chief Minister in pandharpur of kartiki Ekadashi | सोहळा कार्तिकीचा... नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान

सोहळा कार्तिकीचा... नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान

आप्पासाहेब पाटील

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला मानाचे वारकरी म्हणून बबन विठोबा घुगे व वत्सला बबन घुगे (रा. माळे दुमाला, ता. दिंडोरी, जि. नाशिक) या दापत्याची निवड करण्यात आली. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकीय महापूजा करता आली.

 कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड केली जाते. घुगे पती-पत्नी मागील १५ वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत आहेत. त्यांना दोन मुले, एक मुली व नातवंडे असा परिवार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Web Title: Varkari The couple from Nashik district was honored with the official Mahapuja along with the Deputy Chief Minister in pandharpur of kartiki Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.