मालट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण ठार, सोलापूर- हैद्राबाद रोडवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:41 AM2018-11-22T10:41:58+5:302018-11-22T10:43:12+5:30

सोलापूर : हैदराबाद रोडवरील आकाश हॉस्पिटलसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील दोन तरूण ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३0 ...

Two youths on two-wheeler killed in the tremors of the truck, the incident on Solapur-Hyderabad road | मालट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण ठार, सोलापूर- हैद्राबाद रोडवरील घटना

मालट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण ठार, सोलापूर- हैद्राबाद रोडवरील घटना

Next
ठळक मुद्देरस्त्यावर अपघात झाल्यानंतर हैदराबाद रोड परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केलीगर्दीमुळे रस्त्यावर बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होताएमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी

सोलापूर : हैदराबाद रोडवरील आकाश हॉस्पिटलसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील दोन तरूण ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३0 वाजता घडला. 

राजेंद्र शिवाजी पवार (वय-२१), रंगनाथ श्रीमंत देवगुडे (वय-२0, दोघे रा. बिंबलवाडी, ता. केज, जि़ बीड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे दोघे मोटरसायकल (क्र.एम.एच.२५, एबी-३२९३)वरून सोलापूरहून हैदराबाद रोडच्या दिशेने जात होते. आकाश हॉस्पिटल येथे वळण घेत असताना समोरून येणाºया मालट्रक (क्र.के.ए.५६, ३५९३) ने जोरात धडक दिली. या धडकेत राजेंद्र पवार हा तरूण गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाला. 

रंगनाथ देवगुडे याला उपचारासाठी जोडबसवण्णा चौकातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अज्ञात ट्रक चालकाविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी...
रस्त्यावर अपघात झाल्यानंतर हैदराबाद रोड परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे रस्त्यावर बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून घेण्यात आली. पंचनामा करून मयत राजेंद्र पवार याचा मृतदेह शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. बराच वेळ दोन्ही तरूणांची ओळख पटत नव्हती. प्रथमत: अज्ञात दोन तरूण अशी नोंद झाली होती. 

Web Title: Two youths on two-wheeler killed in the tremors of the truck, the incident on Solapur-Hyderabad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.