भंडीशेगावजवळील तिहेरी अपघात, एक ठार, आठ जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:50 PM2018-05-17T12:50:06+5:302018-05-17T12:50:06+5:30

पंढरपूर - वेणापूर रोडवरील कोळ्याचा मळ्यानजीक आल्यानंतर जीपचे पुढचे टायर फुटले.

Triple accidents near Bhindsegaon, one killed and eight others seriously injured | भंडीशेगावजवळील तिहेरी अपघात, एक ठार, आठ जण गंभीर जखमी

भंडीशेगावजवळील तिहेरी अपघात, एक ठार, आठ जण गंभीर जखमी

Next
ठळक मुद्दे टेम्पोच्या मागे असणारी दुचाकी टेम्पोच्या खाली गेलीनरेंद्र धार्इंजे त्यांच्यावर अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन

पंढरपूर/वेळापूर : भंडीशेगाव (ता़ पंढरपूर) येथील पुणे-पंढरपूर मार्गावरील कोळ्याचा मळा येथे झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात वेळापूरचे जि. प. सदस्य त्रिभुवन धार्इंजे यांचे बंधू नरेंद्र विनायक धार्इंजे ( वय ५२) यांचा मृत्यू झाला़ तसेच ७ ते ८ जण जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे़

खाजगी प्रवासी वाहतुक करणारी जीप (एम़ एच़ १३ -०६११) ही बोरगाववरुन पंढरपूरकडे निघाली जात होती. पंढरपूर - वेणापूर रोडवरील कोळ्याचा मळ्यानजीक आल्यानंतर जीपचे पुढचे टायर फुटले. भरधाव असणारी जीप चालकाचा ताबा सुटल्यामुळे समोरुन येणाºया छोटा हत्ती (एम़ एच़ ०४ डी़ के़ २८७५) वर जाऊन आदळली.

यादरम्यानच टेम्पोच्या मागे असणारी दुचाकी टेम्पोच्या खाली गेली. आणि एकदम चित्रविचित्र अपघात घडला़ यावेळी छोटा हत्तीमध्ये बसलेले नरेंद्र धार्इंजे यांचा जागीच मृत्यू झाला़ त्यांचे सहकारी धनाजी लोखंडे हे गंभीर जखमी झाले आहेत़ जीप व दुचाकीमधील मिळून ७ ते ८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

नरेंद्र धार्इंजे यांच्या अपघातील मृत्यूची वार्ता समजताच वेळापूर मुख्य व्यापारी पेठ, बस स्टँड, पालखी चौक व ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन धार्इंजे यांना श्रद्धांजली वाहिली़ अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी  वेळापूर येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ नरेंद्र धार्इंजे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Web Title: Triple accidents near Bhindsegaon, one killed and eight others seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.