सोलापुरातील पोलीस कर्मचारी, अधिकाºयांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:54 AM2019-05-29T11:54:26+5:302019-05-29T11:55:38+5:30

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय; नूतन पोलीस आयुक्त रूजू झाल्यानंतर निघणार आदेश

Transfers will take place in Police Force, Officers of Solapur | सोलापुरातील पोलीस कर्मचारी, अधिकाºयांच्या होणार बदल्या

सोलापुरातील पोलीस कर्मचारी, अधिकाºयांच्या होणार बदल्या

Next
ठळक मुद्देनूतन पोलीस आयुक्त रूजू झाल्यानंतर निघणाºया आदेशात कोणाची बदली कोठे होईल याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात आहेतपोलीस स्टेशनला काम करून कंटाळलेले काही कर्मचारी, अधिकारी आयुक्तालयात काम करण्यास इच्छुक आयुक्तालयातील अनेक कर्मचारी पोलीस स्टेशनला काम करण्याची संधी मिळेल का ?

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी व अधिकाºयांच्या बदल्यांची यादी तयार झाली आहे. कमिटीची बैठक होणार असून, नूतन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे रूजू झाल्यानंतर बदल्यांची आॅर्डर निघणार आहे. 

शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण सात पोलीस स्टेशनचा समावेश आहे. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगरवस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आदी कर्मचाºयांची यादी तयार झाली आहे.

एकाच पोलीस ठाण्यात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाºयांची बदली होणार आहे. काही कर्मचाºयांनी व अधिकाºयांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला असून, त्याचाही विचार केला जाणार आहे. पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा, महिला अन्याय-अत्याचार निवारण केंद्र, क्युआरटी, आय.बी., गुन्हे शाखा, आस्थापना विभाग, कंट्रोल रूम, पोलीस मुख्यालय आदी ठिकाणच्या कर्मचारी व अधिकाºयांच्याही बदल्या होणार आहेत. एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केला आहे, अशा कर्मचाºयांची माहिती गोळा करण्यात आली आहे. नूतन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर खºया अर्थाने बदल्यांचे आदेश निघणार आहेत.   

पोलीस निरीक्षकांच्याही बदल्यांची शक्यता 
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २0 फेब्रुवारी २0१९ रोजी आयुक्तालयातील अधिकाºयांच्या बदल्या झाल्या होत्या. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा वर्ग-१ व वर्ग-२ प्रवर्गातील अधिकाºयांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा आयुक्तालयात रंगली आहे. नियमानुसार असलेला कार्यकाल पूर्ण केलेल्या सहायक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक यांची पदोन्नतीवर बदली होणार असून, त्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. सर्व बदल्या आस्थापनाचे अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये होणार आहेत. 

कर्मचारी, अधिकाºयांमध्ये वाढली उत्सुकता...
- नूतन पोलीस आयुक्त रूजू झाल्यानंतर निघणाºया आदेशात कोणाची बदली कोठे होईल याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. पोलीस स्टेशनला काम करून कंटाळलेले काही कर्मचारी, अधिकारी आयुक्तालयात काम करण्यास इच्छुक आहेत. आयुक्तालयातील अनेक कर्मचारी पोलीस स्टेशनला काम करण्याची संधी मिळेल का? याचा विचार करत आहेत. कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाºयांची बदली होणार यात शंका नाही, मात्र ती कोठे होईल, याची उत्सुकता सर्वच कर्मचारी व अधिकाºयांना लागून राहिली आहे. 

कर्मचारी व अधिकाºयांच्या बदल्यांबाबत माहिती मागवण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या अहवालावरून कमिटीची बैठक होईल, त्यानंतर नूतन पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये बदलीचे आदेश दिले जातील. 
- बापू बांगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा)

Web Title: Transfers will take place in Police Force, Officers of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.