ढगाळ हवामान अन् वाऱ्याच्या वेगामुळे सोलापूरच्या तापमानात २ अंशानी घट

By Appasaheb.patil | Published: April 9, 2024 07:04 PM2024-04-09T19:04:23+5:302024-04-09T19:05:11+5:30

मागील आठ दिवसांपासून साेलापूरचे तापमान ४२ अंशाच्या पुढे गेले होते.

Temperature of Solapur dropped by 2 degrees due to cloudy weather and wind speed | ढगाळ हवामान अन् वाऱ्याच्या वेगामुळे सोलापूरच्या तापमानात २ अंशानी घट

ढगाळ हवामान अन् वाऱ्याच्या वेगामुळे सोलापूरच्या तापमानात २ अंशानी घट

सोलापूर : दुपारनंतर ढगाळ हवामान अन् वाऱ्याचा वेग वाढल्यानं सोलापूरच्यातापमानात २ अंशांनी घट झाली आहे. ४२ अंशाच्या पुढे गेलेले तापमान मंगळवारी ४०.२ तर किमान तापमान २८.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रता ६० टक्के एवढी नोंदली गेली.

दरम्यान, मागील आठ दिवसांपासून साेलापूरचे तापमान ४२ अंशाच्या पुढे गेले होते. ५ एप्रिल रोजी ४३ अंशाचा टप्पा ओलांडला होता. १ ते ८ एप्रिल या कालावधीत तापमान ४० अंशाच्या पुढेच नोंदले आहे. वाढत्या तापमानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून सोलापूरकर घामेघुम होत आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून उन्हाची तीव्रता जाणवते.

दुपारी कडक ऊन पडत असल्याने शहरातील रस्त्यावर वाहनांची संख्या कमी दिसून येत असून रस्ते सामसुम दिसून येत आहेत. वाऱ्याच्या वेग वाढल्याचे दिसून आले. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोलापूरचे तापमान सतत वाढत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अनेक दिवस सोलापूरचे तापमान हे राज्यात सर्वाधिक होते. विदर्भापेक्षा सोलापुरात अधिक तापमानाची नोंद होत होती. आता देखील सोलापूरचे तापमान सतत वाढत आहे.

Web Title: Temperature of Solapur dropped by 2 degrees due to cloudy weather and wind speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.