सोलापूरहून पुण्याला पोहोचा फक्त ५५ रुपयांत; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

By Appasaheb.patil | Published: September 19, 2022 03:48 PM2022-09-19T15:48:24+5:302022-09-19T15:48:28+5:30

सर्वसामान्यांची सोलापूर-पुणे पॅसेजर गाडी सुरू

Reach Pune from Solapur for just Rs 55; Good news for railway passengers | सोलापूरहून पुण्याला पोहोचा फक्त ५५ रुपयांत; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

सोलापूरहून पुण्याला पोहोचा फक्त ५५ रुपयांत; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

Next

सोलापूर : कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली सोलापूर-पुणे पॅसेजर गाडी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा सर्वसामान्यांचा सोलापूर ते पुणे हा प्रवास आता अगदी स्वस्तात होणार आहे. तीन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर रेल्वेची प्रवासी सेवा पुन्हा रूळावर आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन बंद असलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत आहे. एक्सप्रेस, मेल, मेमूसह पॅसेजर गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या नियमित प्रवाशांची संख्या मोठी आहे. नोकरदार, विद्यार्थी, पुणेरी सोलापूरकरांचे नातेवाईक, कामानिमित्त ये-जा करणारे लोक, त्यामुळे या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडीला मागील दोन ते तीन दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जाणून घ्या गाडीची वेळ

सोलापूर-पुणे ही गाडी सोलापुरातून दुपारी ११.४० वाजता सुटेल अन् सायंकाळी ७.२५ वाजता पुण्यात पोहोचणार आहे. शिवाय पुण्याहून ही गाडी रात्री ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता सोलापुरात पोहोचणार आहे. ब्लॉक किंवा क्रॉसिंगसाठी थांबल्यास गाडीला पोहोचण्यासाठी वेळ लागू शकेल अन्यथा ही गाडी वेळेवर धावणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. 

असे आहेत तिकिटाचे दर

  • प्रवास - सोलापूर ते पुणे
  • जनरल क्लास - प्रतिप्रवासी ५५ रुपये
  • स्लिपर कोच - १८५ रुपये

----------

Web Title: Reach Pune from Solapur for just Rs 55; Good news for railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.